बुधवार, १० ऑगस्ट, २०११

“गुरुपोर्णिमा”.



 आषाढी पोर्णिमा
नुकत्याच सुरु झालेल्या पावसामुळे मने हिरवी असताना जी आषाढाची पोर्णिमा येते ती असते गुरुपोर्णिमा. गुरु पौर्णिमेचा काळ ठरवायचा तर महाभारतापर्यंत मागे जावे लागते. या दिवशी व्यास पूजा करायची प्रथा आहे.महर्षी व्यास हे आद्य गुरु मानले जातात.महर्षी व्यास हे शंकराचार्याच्या रुपाने पुन्हा अवतीर्ण झाले अशी भाविकांची श्रद्धा आहे. सर्व ज्ञानाचा उगम व्यासापासून अशी धारणा आहे. व्यापक दृष्टीने पहिले तर व्यास हि व्यक्ती नव्हे तर शक्ती आहे. हि शक्ती गुरुपोर्निमेच्या मध्यरात्री फिरून कृपेचा अभिषेक करते अशी धारणा आहे. प्रत्येक गुरूच्या अंगी व्यासाचा अंश असतो असे मानून गृपोर्निमेच्या दिवशी गुरूला वंदन केले जाते. ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला गुरूचा महिमा बोलका आहे... सद् गुरुसारखा असता पाठीराखा....!इतरांचा लेखा कोण करी...!!
काही नाती रक्ताची असतात. पण काही रक्तापेक्षाही  घटट असतात. त्यातलं एक मैत्रीच, दुसर गुरु-शिष्याच. आयुष्यात मित्र असेल तर सोन्याला सुगंध जणू... पण मित्र आयुष्याला अर्थ देईलच असे नाही. ते काम गुरुच. गुरु नेमक करतो तरी काय? तर गुरु दृष्टांत देतो. उत्कर्षाची वाट दाखवतो. आयुष्याला अर्थ देतो. संगीताच्या घराण्यात भास्कर बुवा वखले, भीमसेन जोशी यांनी गुरुकडे पडतील ती कामे केली. मुस्लीम गुरुकडे हिंदू शिष्य गुरुकुल पद्धतीने वाढले. शिष्योत्ताम्माना योग्य पातळीवर येण्यापूर्वी जे कराव लागल त्याला रेगिंग म्हणून कसं चालेल? तोच तर जीवनानुभव असतो आणि तो गुरु कडे मिळतो. कुठलीच विद्या स्वस्तात मिळत नाही. त्याच परंपरेत एकलव्य सारख्या धनुर्धाराला आपला अंगठा द्यावा लागला, तर विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामाला आपल्या गुरूच्या रक्षणासाठी युद्ध करावे लागले.
गुरुपोर्णिमा हा कोणता सण नाही जो साजरा करण्यासाठी गुरूला हार, फुले, फळ, पैसे किवा कपडे दिले जातात. तर ह्या पवित्र दिवशी खऱ्या मनाने गुरूला साम, दाम, दीक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान, विवेक, वैराग्य, मनःशांती, खरेपणा, उदारपणा, पवित्रपणा, चारित्र्य, चांगले वागणे आणि आत्मसमर्पण ह्यासारखी १५ प्रकारची फुले श्रद्धेने अर्पण केली जातात. गुरूला आपल्या संस्कृती मध्ये देवाचे स्थान दिले गेले आहे. ज्या आद्य शक्तीची ह्या दिवशी पूजा होते ते महर्षी व्यास म्हणजे महाभारताचे कवी, ज्यांनी खुद्द विद्यापती गणेशालाच लेखनिक बनवलं. व्यासोचछीष्टमं जगत सर्वं !असा ज्यांचा गौरव होतो त्या महान गुरूला, त्या आद्य शक्तीला माझा कोटी-कोटी प्रणाम !!!!!
GURU is Shiva without his three eyes!
Vishnu without his four arms! Brahma without his four head!
He is Param-Shiva himself in Human Form!!!

Sheetal Pote sheetalpote4475@gmail.com
Sheetal Pote

1 टिप्पणी:

  1. मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. अशा परमपूजनीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
    अधिक माहितीसाठी : http://www.sanatan.org/mr/a/cid_316.html

    उत्तर द्याहटवा