katha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
katha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १० ऑगस्ट, २०११

..पावसाने आज पडायलाच हवे होते का?.



नुकताच धापा टाकत तो घरी आला होता.. तीन-चार माहाच्या वाऱ्याच्या जटील गरम वाफा नमून आज कुठे थोडी काळी गजराजे मेघात साचली होती...विजेच्या व्याघ्र गर्जना परिसर कंपून टाकत होता..सोसाट्याचा वारा सुटला होता..स्वप्नात आलेला देवाचा अवतार, नशिबाचा वार आणि पहिल्या पावसाचा मार याची वेळ आणि निश्चिती कोणालाच नसल्याने रोजचा पोटा-पाण्याकरता सकाळी देवाच्या पाया पडून घराबाहेर पडलेला जनसमुदायाचा थवा परत 'अतिथी' सारख्या दस्तक देवू पाहणाऱ्या पावसाची वाट पाहत पण त्या आधी पोहचलेल्या दरबारी लवाजमा म्हणजेच प्रधानजी वादळ, सेनापती विजा आणि लष्कर वत गर्जनाना घाबरत सैरावैरा आपल्या निवाऱ्याकडे पळत होती...पक्ष्याचा किलबिलाट ही या सर्व धावपळीला साथ देत होता..दुकाने अर्धवट बंद केली गेली होती..नुकतेच रस्त्यावर आलेले फेरीवाले समोरून आड येणाऱ्या गर्दीबरोबर- गाड्या बरोबर कबड्डी कबड्डी करत इकडे तिकडे पाणी पडणार नाही अशी जागा शोधण्याचा शर्यतीत होते.. शहराच्या गर्दीत फार कमी नजरेत पडणारी रस्त्यावरची, बागेतली, नर्सरीतली झाडे, रोपटी मात्र कांदेपोहे कार्यक्रम असल्यासारखे आपल्या प्रियकर पावसाची वाट पाहता लाजून 'हिरवी' झाली होती...शत्रूचा गड सर केल्यासारखे काही जण मात्र आवरत सांभाळत सुखरूप घरी पोहचले होते...त्याच्यासारखे ...!!!...

दरवाजा अर्धा उघडाच होता..तो आत गेला..बुटांच्या दोऱ्या सैल केल्या पण न काढताच सोफ्यावर जाऊन बसला..त्याच्या आगमनाची बहुधा स्वयंपाकघरास चाहूल लागली असावी कारण काही भांडी आपटल्याचा स्पष्ट आवाज चूळ पेटवण्याच्या अस्पष्ट आवाजाबरोबर त्याने टिपला..तस फार आज काम होते असे ही नाही किंवा दमला आहे असेही नाही पण 'आत' कळले असेलच असे गृहीत धरून त्याने 'मी आलो' अशी हाक दिलीच नाही आणि तसेच पाय लांब करत हळुवार पवन क्रीडा दावणाऱ्या पंख्याकडे डोळे लावून तो बसला..चहाच्या उकळीचा आवाज आता येईल आता येईल अशी वाट पाहत त्याने सहजच डोळे बंद केले...त्याला चहा लवकर हवा होता...कारण त्याला ठरवल्याप्रमाणे कोठेतरी जायचे होते...आयुष्याच्या काही मुलभूत आणि महत्वाच्या निर्णयाची आज घडी होती...

'चहा देताय ना..?'
'हो हो आणते' - आतून 
.............
x x x x x x x x x x 

घरातून निघताना पाच-सहा वेळा त्यांनी आरश्यात पाहीले असावे..!!! बहिणीचा लेडीज सेंट, स्वत:चा फुकटचा दिओडरंट, बाबांच्या कपाटातल अत्तर, मग उपलब्ध सर्व क्रीम, लोशन असे हाताला भेटेल ते आठवेल ती सर्व 'अवजारे' त्याने आपल्या सर्वांगाला चिकटवून टाकली होती.!!!!! बहुतेक कोणीतरी मागे उभे राहून सांगतय किंवा शिकवणीत तुझ हे गणित चुकलंय परत सोडव बघू अश्या अविर्भावात कारण नसतानाही केसांची झुलपं त्याने दोन-पाच वेळा 'सेट' केली..तोच प्रकार कपड्यांच्या बाबतीत पण..!!! असं वळून बघ, तसं वळून बघ, थोडे पुढे जावून, मागे वळून, गॉगल घालून, मग परत तो काढून, मग हाताची घडी घालून, एखाद स्माईल देऊन, एक-दोन डायलॉग बोलण्याचा भाव आणून असे सर्व इकडचे तिकडचे उसने प्रकार आटपून आपली Personality साजेशी झाली आहे अस ठाम करून घराबाहेर पडला....'मी जरा जावून आलो गं..' असं बोलला तर खर पण कुणी घरातल्याने ऐकल की नाही एवढ परतून बघायलाही त्याला वेळ नव्हता...

अजूनही ढग आकाशात आरडा ओरडा करत होते..छत्री घेवू की नको?..नको अस लगेच confirm करीत त्याने रिक्षाला हात दाखवला देखील....!!

वारा अजूनही धुम्श्यान घालत होताच.. 
'पावसाने आज पडायलाच हवे होते का?..'  तो त्रासिक नजरेने पुटपुटला. 

ठरल्याप्रमाणे ती बागेत वाट पाहत होती. नुकतीच शिकवणी आटपून आल्याने पुस्तकांचाची थप्पी ही हातात होती. मुद्द्याची गोष्ट म्हणजे ती ज्या शिकवणीत शिकवायची त्यात हे विद्यार्थी होते.!! कधी काळी परिस्थितीने अपूर्ण राहिलेली पदविका पूर्ण करण्यासाठी बाहेरून बसलेले होतकरू उमेदवार..कष्ट करत मोठा झालेला..गुणवत्ता आणि पुढे जाण्याची जिद्द ठासून भरलेला..कोणाच्या अध्यात मध्यात नाही..सरळ मार्गी.. कुठल्याश्या कंपनीत कारकून होता.. प्रमोशन होवोत यासाठी शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपड करत होता.. कॉलेज करणे वेळेअभावी जमणार नाही म्हणून बाहेरून शिकवणी लावलेला.. आता त्या वर्गात ही सर्वच त्याच्यापेक्षा लहान.. कोणाची आपुलकीची तर कोणाची चेष्टेची नजर त्यावर... हा मात्र आपल शिक्षण आणि आपलं काम यातच.. सर्व रीतसर चालले होते.. एका गोष्टीशिवाय..

मराठी शिकवणाऱ्या बाईसाहेब कु. अंजली फडणीस त्याला आकर्षित करू लागल्या होत्या..दिसण्यात चार चोघी सारख्याच पण समझदार, हसतमुख आणि प्रकार्षित होणारा आत्मविश्वास..अभ्यासाशी फार पूर्वीच ह्याच नाते तुटल्याने अभ्यासात याला त्याला खूप अडचणी यायच्या..त्या सोडवून देताना अंजली बाईंची आपुलकी याला आवडू लागली होती.. ह्याची खरी परिस्थिती तिला जाणवू लागल्यावर तिनेही स्वत: त्याच्या अभ्यासात- त्याच्यावर विशेष लक्ष पुरवले होते..तसा तोही तिला आवडायचा म्हणा...गरिबी किंवा जात असं तिला दुरावा नव्हताच..उलट त्याची कुठलीही गोष्ट शिकण्याची जिद्द, सरळमार्गीपणा  तिला त्याच्याकडे खेचू लागला होता...हे आकर्षण आहे की प्रेम?..चांगल आहे की वाईट?...सांगाव की नको?...या सगळ्या गोष्टीचा गृहपाठ घरी गेल्यावर दोन्ही शिक्षणार्थी आणि शिक्षिका यांच्या मनात अथांग चालत राहायचा..दोन्ही मोठे होत असलेले प्रेमाचे रोपटे अजूनही स्वत:ला एकतर्फी या 'जातीचा' च समजत असल्याने "याच त्याच / तिच पुढे काय होईल?" याची दोन्ही मनाला चिंता होती..कोर्स आता संपण्याच्या मार्गावर आला होता...आता धीराची परीक्षा करणे म्हणजे दिल्ली हरल्यासारखे आहे असे उमगून शेवटी यानेच तिच्या वाढदिवसाचं निमित्त साधून तिला आपल्या मनाची गाथा एका चिठीत मांडून अलगद एकट्यात दिली..त्या चिट्ठीच भविष्य आज त्याला त्या बागेत कळणार होते .. मुद्दामहून आज त्याने शिकवणी हुकवली होती...आणि आता चिठीत लिहिल्याप्रमाणे तिला तो बागेत भेटायला आल होता..थोडासा घाबरत घाबरत..कितीही झाले तरी त्याची शिक्षिका होती..

'.............'-( याच स्मितहास्य मान खाली)
( तिचा राग (लटकाच) डोळे भरून त्याकडे पाहन..)
थोडा वेळ असंच...बागेच्या फुलांच्या मंद सुवासाबरोबर निशब्द...
मग ?..- तो ( काय ठरवलं तू?..विचारायची ताकद नाही )
'मग काय...सब ठीक ..चाललय..'- ती 
'नाही म्हणजे...' - तो ( जीभ चावली परत गप्प)
' सांगू शकत नाही ?..' ( थेट मुद्द्यावर ती)
'अ..हा..म्हणजे..हो...म्हणजे ..तू..नाही..मी...नाही...'...- तो ( पुरती तारांबळ उडालेली)
'हो'........
'नाही..मी सांगणारच होतो...म्हणजे विचारणारच होतो..म्हणजे..तू काही बोललीस?...' - तो 
( ती लाजलेली..पुस्तकात डोक लपवून खाली पाहत...हा माठ्या असाच उभा..!!!)..
'हो.." - तिचा परत एकशब्दी जवाब...
'म्हणजे माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर..'- तो (अजूनही प्रश्नच विचारण्याच्या भानगडीत...!!!)
'नक्की ना?..आयुष्यभर साथ देशील ना?..' ती (अजूनही गमतीच्याच मूड मध्ये..)
' हो ग नक्की..तुझी शपथ..' - तो 
'बघ हा पाऊस ऐकतोय...हा हा हा...हो रे राजा..माझपण...' - ती 
'हो गं..शपथ म्हणजे शपथ...' - तो 

हरलेला डाव अचानक जिंकल्यासारख झाल त्याला..काय करू नाचू..ओरडू..काही सुचेनास झाल..ती अजूनही पुस्तकात बघत लाजत उभी होती...हलक्या हलक्या सारी सुरू झाल्या होत्या..थापलेला मेकअप, भिजणारे कपडे..काही काही कळत नव्हते..ती पण आता वर त्याच्याकडे बघत एका पायाने पायाखालच गवत उकरत तशीच उभी होती..दोन जीवाचं तन-मन-धन कोवळ्या वरुण राजाची कृपा गोळा करत होत...नकळत तिच्या हातातली पुस्तके कधीच खाली पडली होती..चिखलाच्या रंगात सामील होत होती... ते ही पावसाचा आनंद मुकाटपणे घेत होती सारी मोठ्या होवू लागल्या होत्या...पुस्तकांना एवढा वेळ आधार देणारा तिचा हात आता त्याच्या गळ्यात विराजमान झाला होता...तिची तिच्या कंबरेवर त्याची अलगद मिठी जडली होती..चार डोळे एकरूप होण्याचा प्रयत्न करत होते...दोन जीवाचं प्रेमाने एक दुसऱ्यासाठी प्रेमाने कबूल झालेलं सर्वांग आता पावसाने व्यापून टाकले होते...फक्त त्याचे ओठ सोडून..कारण ते कधीच एकमेकात गुंतले होते...वाढलेल्या पावसाने चाहूल देणारी थंडी त्याच्या प्रेमाच्या उबेने कितीतरी वेळ थोपवून ठेवली होती....!!!! 

रीतसर लग्नाच्या तारखा ठरल्या...दोघांचे हात पिवळे झाले....सामाजिक रितीरिवाजात लाल ही झाले...खूप खुश होते ते दोघे...म्हणजे सर्वच..इतके दिवस अभ्यासात तात्पर्य त्यार्थी उत्कर्षात साथ देणारी अंजली आता रेशीमगाठ बांधून पूर्ण जीवनभर साथ देण्यासाठी त्याच्या आयुष्यात आली होती....बाहेरच्या अंगणातल्या तुळशीला पाणी देणारा 'हाथ' आता बदलला होता..देवघरात आईच्या कीर्तनाना साथ देणारा 'गळा' आला होता...मग बाबाची औषधे..त्याच्या वेळा...मग बहिणीचे अभ्यासाचे वेळापत्रक...याच्या बढती झाल्यावर याला कधीच न भेटणाऱ्या फाईली..सर्व सर्व गोष्टी मुकाट्याने वागू लागल्या होत्या... शेजारधर्म तिच्या स्वभावाचा गुणगान गावू लागला होता... तशी सक्ती नव्हतीच तिला पण कुटुंबावर- त्याच्यावर पूर्ण लक्ष आणि प्रेम पुरवता यावे यासाठी तिनेच आपले काम सोडले होते...काही खडे फोडण्यासारख तर दूरची गोष्ट पण आता देवाकडे मागण्यासारख पण उरल नव्हत...सुख म्हणजे काय ही व्याख्या कोणी त्याला विचारावी...!!!!  

सोन्याहून पिवळे त्याच्या नशिबात आले होते..दु:खाचे सर्व ओरखडे आता त्या पहिल्या पावसाच्या साक्षीने आणि कृपेने धुतले गेले होते..तसा दिवाळीचा मुहूर्त पण पहिला पाऊसच आपल्या स्वर्गाच्या गाठीचा दिवस- लग्नाचा वाढ दिवस म्हणून मनाने साजरा करावा असे त्याने कधीच ठरवले होते..मध्येच देवाने अंजलीचा डोहाळे जेवणाचा बेत आखला आणि दुधात अजून साखर पडल्यासारखे झाले...होळीच्या शपथेवर 'अंकित' साहेब पदरात पडले...

.....माणूस जसा देवाचे आभार मानतो तसे हेही मानायचे पण या जीवनाला पावसाची खूप मोठी कृपादृष्टी लाभली आहे असे त्या दोघांना नेहमी वाटे..तेहतीस कोटी देवातला 'वरुण देव' आता त्यांचा कुलदैवत झाला होता...अंकित आल्याने तर आता सुखात अजून भर पडली होती..सर्व घर गजबजून गेले होते..

...
...
आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता...!!! तोच पहिला पाऊस..!!! त्याला कल्पना आली होती..आजचा पडेल अशी..ऑफिसला गेल्यावर अर्ध्या दिवसाची रजा घेतली होती.. दोघेही मस्त भिजायला जाणार होते..तसेच..पूर्वीसारखे... हातात हात घालून...किती मज्जा येणार नाही...?...आज तर अंकित पण असेल की...याहू.....

तरी घरी जाईपर्यंत थोडा भिजलाच तो..........

x x x x x x x x x x 

'भिजलास काय रे?...टॉवेल आणू?...'आतली व्यक्ती बाहेर आली..
नाही...वाचलो...पण आता जाताना भिजेन बहुतेक...- तो 
हा घे चहा....- ती 

..ती त्याची आई होती..!!!!

हे बघ बाळा..मला माहितीये तुझ्या मनात काय आहे ते..भावना आहेत..दु:ख आहे..पण आता अंजली 'जावून' पाच वर्ष झालीत रे...किती वेळ असंच राहणार.?..तुझा नाही कमीत कमी अंकित चा तरी विचार कर ..त्याला आई म्हणजे काय असते ते कळू दे की..नंतर खूप त्रास होईल रे त्याला...शुभांगी चांगली मुलगी आहे..तिला सर्व गोष्टींची कल्पना दिली गेलीली आहे..बाबा पुढे गेले आहेत त्यांच्याकडे..जा फ्रेश हो जा आणि जावून ये...जा बाळ असा निर्णय कधी ना कधी घ्यावाच लागणार होता ना ...चल आजच समझ...जा..देव काहीतरी मार्ग काढतोय बघ...

'अंकित कुठे आहे..?..' - तो
'पोट्ट्या ऐकतोय कुठे?..दार उघड दिसल पळाला बाहेर..अंगणात असेल बघ..'
'अंकित..अंकित...येतो मी...' - आईला सांगून तो बाहेर निघाला...

सरी आता मोठ्या झाल्या होत्या...अंगणातल्या रोपाबाजुच्या छोट्या पायवाटीत पाणी साचून एक लहानसा ओढा तयार झाला होता..अंकित त्यातच हात पाय मारीत काहीतरी गोळा करीत होता..एक भिजणाऱ्या कागदाची होडी बनवून तिला पोहते ठेवण्याचा प्रयत्न करत होता...बाबांना बघून खुश झाला..बोबड्या तोंडाने ते आपले पराक्रम दाखवू लागला...त्याने पण पुढे जाऊन स्मित हास्य देत त्याचा लटपटता हात धरला..

'जा बच्चा, घरी जा पावसात भिजू नको नकोस ..आजी आहे बघ..खाऊ देईल..'
'बा..बा...ती होली...' - अंकित..बोबडत..
'अरे वाहः.. मस्त आहे..जा आता आत जा हा..' - तो 

ट्रिन ट्रिन.. ट्रिन ट्रिन.. त्याचा फोन वाजला...( बाबाचा होता..)
'हलो..हा बाबा...निघतोय..'

'बा..बा..मी पण येणाल ...' - अंकितचा हट्ट 
'नेईन हो..पुढ्या वेळी नक्की हा...बाळा..जा आत जा.. हा बाबा १५-२० मिनटात येतो मी..' - तो अंकित आणि फोनवर बाबा दोघांना सांभाळत बोलला..

'नक्की?..' - इति अंकित 
'नक्की बेटा..' -तो  'जावू मी ?..' -तो

त्याच्या उत्तराची वाट ना पाहता तो निघायला तयार झाला..अंकितचा मुका घेतला..फोन बंद केला..आणि चालू लागला..आणि....
आणि...आणि...

वीज अंगावर पडली असा तो थांबला...चटकन मागे वळला..कारणही तसे होते..आणि अंकित चे उद्गारही...

'पाऊश मामा ऐकतोय ना?..मी पण जाणाल नंतलला ..बघा हा बाबा पाऊश पण ऐकतोय...' 

तो गुढघ्यावर बसला..हा सहा वर्षाचा चिमुरडा काय बोलून गेला हे?..त्याने नजरेनेच अंकित ला जवळ बोलावले..पाऊस मोठा झाला होता...त्या दिवशी सारखा...त्या पहिल्या दिवशी सारखा..तसाच त्याच्या सर्वांगाला भिजवीत होता...पण डोळे सोडून..

कारण डोळे मात्र आत साठलेले पाणी मोकळे करण्यासाठी पावसाच्या पाण्याशी स्पर्धा करत होते...ते अंजलीला शोधत होते..गढूळ पाण्यात एक प्रेमाची आठवण स्पष्ट होत होती...बाबांचा फोन पुन्हा एकदा ट्रिन ट्रिन करत खिशात बोंबलत होता..आई दारावर अंकितला घ्यायला बाहेर आली होती...अंकित मात्र बाबाच्या कुशीत येवून चिमुकल्या डोळ्यांना त्रास देणाऱ्या पावसाच्या थेंबाकडे वर बघण्याचा प्रयत्न करत होता...

आता पर्यंत मानसिक सबळ असणाऱ्या त्याच्या सहनशीलतेला तडा गेला होता.. मन त्याला विचार करण्यासाठी सारखे सारखे निरोप पाठवत होते..नियतीने फुकटात दिलेल्या वेड्या पिश्या गजराजासारख्या भासणाऱ्या एकटेपणाला ज्या एका 'मी'पणाच्या अंकुशाने रोखून ठेवलं होते..त्याला आता 'अंकित'च्या बोलक्या प्रेमाने नाहीशे केले होते....

काय हेच प्रेम शुभांगी त्याला देवू शकेल?...काय तिला तिच जीवनही सुखात घालवता येईल माझ्याबरोबर...??..
..
( प्रश्न असंच त्याचा सारखा पावसात भिजत होता...उत्तर मात्र दूर दूर पर्यंत दिसत नव्हते...)
..


शुभांगीच्या हाताने बनवलेले पोहे थंडपणे त्याची वाट पाहत होते..आणि आकाशात एक ओळखीचा ढग खूप जास्त रडल्यासारखा पाणी फेकत होता...( ती अंजलीच असावी..)

आणि हा...
हा मात्र अंकित कडे बघत होता...बडबडत होता...रडत होता..

' हा बेटा..पाऊस मामा ऐकतोय ना?.. मी आहे ना..शपथ म्हणजे शपथ.......'

x x x x x x x x x x 

'पावसाने आज पडायलाच हवे होते का?..' - कोणीतरी पुटपुटलंच...
कोण तो?..

तुम्ही तर नाही ना....?..
असो..

तनवीर सिद्दिकी...

बाबा...


हॅलो सरमी बर्लिनहून बोलतोय! सर मी २८ वर्षांचा आहे आणि माझे आई-वडील ठाण्यात असतात. बाबा म्हणतायेत तू शिक अजून. ते कर्ज काढतायेतपण मला वाटतंय आता बस्स! मी पीएच.डी. झालोय..’ नावसुद्धा न सांगता हा मुलगा ऊर फोडून बोलत होता. माझ्या तोंडून फक्त.. हं.. हं..! मी परत ठाण्याला चाललोयबाबांना सांगणार आहेतुम्ही रिटायर व्हा! माझे बाबा खरंच दमलेत हो.. गेले काही दिवस मी खूप दिवस अस्वस्थ होतोपण काय करावं सुचत नव्हतं. इंटरनेटवर ‘दमलेला बाबा’ गाणं ऐकलं आणि परतीचं तिकीट काढलं.’ आता माझ्या तोंडून हं.. हं’ सुद्धा जात नव्हतंइतका सुन्न झालो मी. एक उच्चशिक्षित तरुण इतका हळवा होऊन छोटय़ा मुलासारखा रडत होता.. बाऽऽऽऽप रे! हे काय आहेदादचांगल्या गाण्याला प्रतिसाद़़की रसिकता़़़,हळवेपणाखरेपणा.. खूप विचार केला आणि उत्तर सापडलं ते एवढंचकी याला म्हणतात नातं.
दूर देशी गेला बाबागेली कामावर आई..
नीज दाटली डोळ्यांत.. तरी घरी कुणी नाही..हे आमचं गाणं ऐकून एक भगिनी रंगात येऊन रसग्रहण करीत होत्या- आजचे आई-बाबा स्वत:मध्येच इतके व्यस्त असतात कीमुलांसाठी वेळ आहे कोणाला?आजची मुलं फार एकटी झाली आहेत. त्यांची व्यथा.. वगैरे वगैरे.. त्या कौतुक करत होत्या. पण ते ऐकताना डोक्यात इतका कल्लोळ झाला कीवाटलंआम्ही नाही हो इतके वाईटनाही हो इतके स्वार्थी.. हतबल आहोत आम्ही! ..डोळ्यासमोरून एखादा चित्रपट जावा तसे मी पाहिलेले सगळे व्यग्र बाबा’ सरकत होते..
खूप आधी ठरवूनसुद्धा आयत्या वेळेला बॉसनी महत्त्वाचं काम लावलंम्हणून मुलाच्या गॅदरिंगला जाऊ न शकलेला बाबा..’, त्याच गॅदरिंगमधलं मुलाचं गाणं फोनवरून ऐकून गाडीत एकटाच टाळ्या वाजविणारा बाबा’,परदेशातून येताना मुलीने फर्माईश केलेली बार्बी डॉल घेऊन वाढदिवसाच्या दिवशी पोहोचण्याचा आटापिटा करताना विमान रद्द झालेम्हणून रात्री उशिरा पोहोचल्यावर मुलीच्या उशाशी बाहुली ठेवून झोपलेल्या त्या मुलीकडे पाहत आपले अश्रू इतरांपासून लपवणाराबाबा..’, नाटकाच्या दौऱ्यावर असताना दर चार तासांनी आपल्या बायकोला फोन करून सहा महिन्याच्या बाळाच्या कानाला फोन लावायला सांगून हॅलो हॅलो. मी बाऽबाम्हणत आपला सहवास देऊ पाहणारा अस्वस्थ बाबा’,घरापासून दूर सहा-सहा महिने बोटीवरयुद्धभूमीवरराहणारा आणि पत्रातूनफोनमधून माझी आठवण काढतात ना मुलंमी आठवतो ना त्यांनाअशा प्रश्नांनाबायकोच्या ‘हो..’ या उत्तरासाठी आसुसलेला बाबा’..इथपासून ते मुलीचं लग्न ठरल्यापासून रोज बोलता बोलता ठसका लागला म्हणून डोळ्यात पाणी आलंबाकी काही नाही..’ असं म्हणणारा ‘बाबा’!बाळाकडे पाहून वेडा होऊन नाचणारा बाबा’, ऑफिसमध्ये अतिशय कडक असलेलापण घरी शाळा-शाळा खेळताना मुलीच्या हातचा धपाटा आनंदाने खाणारा बाबा’, रात्री उशिरा घरी आल्यावर मुलांच्या केसातून हात फिरवत एकटाच बोलणारा ‘बाबा’, मुलांबरोबर फटाके उडवताना पुन्हा एकदा लहान होणारा बाबा’, कामानिमित्त घरापासून दूर राहूनही दर रविवारी काही तासांसाठी धडपडत घरी येऊन मुलांना डोळे भरून बघणारा बाबाशिकायला परदेशात गेलेल्या मुलीशी वेब-कॅमवर गप्पा मारताना तू बारीक का वाटतेस गंतिकडे खूप त्रास होतोय का?’म्हणत ‘नाही तर सरळ परत ये भारतात’ असं सुचवणारा बाबा..
या सगळ्या बाबांची ‘हाक’, त्यांची धडपडकरिअरपैसा हे सारे सांभाळत मुलांबरोबर वेळ घालविण्यासाठी ते करीत असलेला आटापिटा- हे सगळं सांगावसं वाटलं!
अशा प्रत्येक पुरुषाला ही बोच असते. जेव्हा मित्र एकत्र जमताततेव्हा एकमेकांना खूप मनापासून सांगतात की, ‘थोडा आराम करमुलांबरोबर मजा कर’ कळतंपणसाधायचं कधीकसंते कळत नाही. या गर्दीत धावताना आपलं जगणं कुठे आपल्या हातात राह्यलंय?माझा मुलगा मला जसं म्हणाला कीखूप गमती आहेत माझ्याकडेआता नको पैसेतू घरी थांब.’ ..कुठे थांबायचं हे मुलं सुचवतातपण आपल्यालाच समजत नाही. धावत राहतो आपण. आणि मनात ही भीतीही बाळगतो कीउद्या मुलं मोठी झाल्यावर गरज असेल त्यांना आपली?अस्वस्थ मनानं हे सगळं संदीप खरेशी बोललो. त्याचं आणि माझं नातं म्हणजे -
न सांगता तू मला उमगते सारे 
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बंध
कळ्यांचा चाले कळ्यांशी संवाद.
असं आहे. त्यालाही हे सारे असंचइतकंच तीव्रतेने वाटत होतं आणि त्याच्यातला हळव्या मनापासून कविता लिहिली. माझ्या अस्वस्थ अवस्थेतच चाल तयार झाली होती. दु:खापेक्षाही उद्विग्नताफ्रस्ट्रेशन मांडणारी ही चाल आणि ते शब्द यांतून हे गाणं रसिकांच्या मनात खूप खोलवर रूजलं.
प्रत्येक ठिकाणी वेगळे किस्सेवेगळ्या प्रतिक्रिया.. कार्यक्रमात छोटी-छोटी मुलं-मुली आपल्या बाबांना रडताना पाहून सुन्न झाली. कोणी माझ्या बाबाला का रडवलंसम्हणून आमच्यावर चिडली. सासरी गेलेल्या मुलींनी बाबा गाणं ऐकलंत?' म्हणत फोन केले. सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुटक्याहळव्या आणि दुखऱ्या..
हे गाणं मुलांनी बाबांसाठी ऐकलं आणि बाबांनी मुलांसाठी,आणि बाबांच्या बाबांसाठीही. हे गाणं जितकं बाबाचं,तितकंच ते आजच्या नोकरी-व्यवसाय करणाऱ्या आईचंसुद्धा..
प्रत्येक ठिकाणी गाण्यावर वेगळे किस्सेवेगळी प्रतिक्रिया.. सगळ्या तितक्याच हळव्यादुखऱ्या.. (इथे वाढू शकतं!!)
आम्हीही घरापासून दूर-दूर पुन: पुन्हा हे गाणं गातो आणि जखम रोज भळभळते. रोज ठरवितो कीया महिन्यात थोडं नीट नियोजन करायचं. मुलांबरोबरकरायच्या अनेक गोष्टी घोळतातपण बघता बघता हा महिना सरकतो.. मग स्वत:लाच पुढच्या महिन्याचं वचन.. हे चुकतंयते समजतंपटतं. जे ठरवतोते हातून घडत नाहीयासारखी दुसरी बोच नाही. थोडं थांबायला हवंय. वेग कमी करायला हवाय.. 
पण निदान हे जमेपर्यंत तरी स्वत:ला टोचून टोचून रोज गायलाच हवं..
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो?लवकर जातो आणि उशिरानं येतो..
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला..



डॉ. सलील कुलकर्णी

नितीकथा


मुलगी आणि तिचे चार मित्र - 



एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.

त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला हवी, असा तिचा कटाक्ष असे.

त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती तिच्या मनात नेहमीच असते.

दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते....तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात त्याचा मोठा सहभाग असतो.

तिचा पहिला मित्र ...त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्यासारखा असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो.

तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.


एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो, ""माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हा माझा मृत्यू होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.

ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, ""मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ करशील ना?''

""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.

त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.

त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले. आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही' म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.'' 

त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.

आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""तू निष्ठेने माझ्या संपत्तीचे आणि मालमत्तेचे रक्षण केलेस...  यावेळीही तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?''

""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''

त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.

... तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी येईन.''

ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी, दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला.
मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून गेली आहे.''


वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.

आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.

आपला तिसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.

दुसरा मित्र म्हणजे, आपली मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप दुसऱ्याचे होते.

आणि पहिला मित्र म्हणजे कोण?
आपला पहिला मित्र म्हणजे आपला आत्मा. 
सत्ता, संपत्ती, भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. खरे तर आत्मा ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी नेहमी आपल्याबरोबर असते. शेवटपर्यंत आपली साथ करते.






गावाकडच्या गोष्टी

201538_207511019268845_100000298447320_743455_233548_o.jpg

आमच्या गावात सुरुवातीला ज्य़ा वेळेस   मोबाइल फ़ोन ची एंट्री झाली त्यावेळेस त्याचा प्रचार करण्याच  काम राज्यात राज्य सरकारण आणि आमच्या गावात आमच्या "गजा " ने व्यवस्थित पार पाडल होत. आमच्या    गजाला सगळ्यात प्रिय आशा गोष्टी तीन. एक म्हणजे मोबाइल, दूसरी म्हणजे गाड़ी आणि तीसरी म्हणजे.................. ?  ती नंतर सांगेन.

          गजा त्या काळी agri चा डिप्लोमा करायचा. १० वि नंतर ११ वि १२ विला कट मारून गजान direct  agri ला एडमिशन घेतल ते "मी ग्रामसेवक होणारच" असा निश्चय करुन. गजा सकाळी ७:१५ च्या गाडीन आपल्या कॉलेजला जायला बाहेर पडायचा त्यावेळी त्याची ऐट पाहण्या सारखी असायची. कड़क इस्त्री केलेला कधीकाळी पांढरा असावा असा शर्ट, त्याच्याखाली तशीच कड़क इस्त्री केलेली निळी  पैंट, पायात घातलेले बूट हे एके काळी त्यांचे आजोबा वापरायचे तो पॉलिश चा ब्रश पाण्यात बुडवून पॉलिश केलेले. पाठीवर कॉलेज कुमार टाकतात तशी एक बैग टाकुन चालताना गजा  जेंव्हा त्या बूटा कड़े पहायचा तेंव्हा त्या बूटांची चमक ही बूटा ऐवजी गजा च्या डोळ्यात दिसायची.
    मोबाइल च्या बाबतीत सांगायच झाल तर आमच्या गावात त्या वेळी फ़क्त सरकारी कार्डला म्हणजे बीएसएनएल लाच रेंज असायची. असायची म्हणजे आणावी लागायची. मग ती रेंज   यावी म्हणून गावातले लोक लाइट चोरन्यासाठी तारेवर आकडा टाकताना  देखिल जेवढी तारेवरची कसरत करायचे नाहीत तेवढी करायला लागले. त्यासाठी गच्ची, गच्चिचा कठडा, झाडावर आणि गावातल्या पडक्या बुरुजावर आशा शक्य तितक्या उंच ठिकाणी जावून बसायाला लागले. पण आमचा गजा? आमच्या गजाला मात्र गावातल्या कोरड्या विहिरीत जरी उभा केला असता तरी त्यान तित पण  रेंज आणून दाखविली असती. कोणत्या भागात कुठला उमेदवार उभा केला म्हणजे निवडून येइल हे जस पक्षातल्या "पक्ष श्रेष्ठी" का काय म्हणतात त्याना नेमक माहित तसाच आमच्या गजा ला गावात कोणत्या area मधे कोणत्या पोसिशन मधे उभा राहून, मोबाइल नेमका किती angle मधे धरावा म्हणजे त्यास रेंज येइल हे जाननारा फ़क्त गजा हाच जानता राजा गावात होता.   त्याचा अभ्यासाच तेवढा दांडगा होता .
  मोबाइल च्या ringtone  बदलण्यापासून  ते एखाद्याच्या मोबाइलची आवडलेली battery  बदलण्यापर्यंतच्या सगळ्या कला गजा ला अवगत होत्या. गजा गावातून जाऊ लागला आणि एखादा नविन मोबाइल घेतलेल्या माणसाने त्याला बघितल की, ओळखीचा डॉक्टर भेटल्या नंतर  नसलेल दुखन सांगुन त्याच्याकडून फुकटात गोळ्या लिहून घेतल्याच समाधान पदरी पाडून घ्याव तस तो मानुस लगेच मोबाइल पुढ करत " आर गजा, ह्याला बघ बर जरा, फ़ोन लावल्यास आवाज कमी आल्या सारखा वाटायलाय"  गजाला काय एवढच पाहिजे असत. एखाद्या ज्योतिष्याच्या हातात एखाद्या सुन्दर बाईचा हात आल्यास  तोदेखिल जेवढा निरखत बसनार नाही  त्यापेक्षा जास्त एकाग्रतेंन गजा तो फ़ोन चेक करायचा. मग आपल्या दिनेश नावाच्या एक रिकामटेकडया मित्राला फ़ोन लावून आवाज खरच कमी येतोय का याची खत्री करायचा. त्यानंतर मग कुठलीतरी बटन दाबल्यासारखी करून पुन्हा मग आवाज वाढला का म्हणून अजुन २-३ कॉल करायचा. शेवटी भिक नको पण कुत्रा आवर म्हणल्यासारख, आर आवाज कमी येऊ दे पण तुझे कॉल आवर असा चेहरा करून तो मानुस  गजा कड़े बघू लागतो तेंव्हा कुठे मग गजा तो मोबाइल, "आता बगा  आवाज कसा येतय ते" आस मोठ्या  आत्मविश्वासांन सांगुन परत करायचा.
असो. तर असा हा मोबाइल स्वस्त झाल्यान गजाला देखिल त्याचा त्याचा स्पेशल असा एक मोबाइल मिळाला. मग काय नविन प्रेमात पडलेल्या मुलासारखी गजाची अवस्था झाली. फ्री मेसेज पैक, night pack , caller tune  , talk time  , balance , call rate  असे शब्द  रात्रंदिवस गजाच्या जिभेवर खेळायला लागले.  पण फ़ोन वर बोलायला पैसे लगत असल्यान ती हौस गजा मिस कॉल देऊन भागवायाचा. पण समोरचा मानुस तरी किती वेळा reply  करणार हो. मग  अशा बीकट संकटात गजाला एक महामार्ग सापडला. कस्टमर केयर. झाले. गजा मग आपल्याच काय गावातल्या भेटल त्या माणसाच्या फ़ोन वरुन कस्टमर केयर ला फ़ोन लावायचा. बर फ़ोन लावायचा तोही मोक्याच्या ठिकाणाहून. म्हणजे मारुतीचा पार, बस स्टैंड, चावडी, किंवा आशिक महादु चौक. त्यामुळ गजा च्या आजुबाजुला चार पोर अपोआअप जमा व्ह्यायची. फ़ोन लागला आणि तिकडून, " हेल्लो, धिस इस अमित, हाउ मे आय अस्सिस्ट यु सर?" असा आवाज आला की गजा लगेच फ़ोन कट करायचा. पुन्हा redial  मग जेंव्हा पलीकडून, " हेल्लो गुड एविनिंग सर, धिस इस कल्पना ,पूजा , रीता, सरिता, बबिता.... आसा आवाज आला की लगेच गजा खुश होउन,"आ.... आं हेल्लो मैडम, ते मी सावरगाव हुन गजा बोलायलोय... मग  जस काय तिकडून ह्याला ओळख दिली त्या पोरीन आसे हावभाव करून, "हा, हा  तर ते मी काय म्हनू लागलो की ते.मला का नै ......... " आस बोलत बोलत कॉल पूर्ण करायचा. एक दिवशी रात्रि तर गजा चक्क झोपितच उसनायाला लागला, " हेल्लो मैडम मी.... , ....मला ते   night    चे रेट कमी करायसाठी  कै स्कीम हाय का...?

  दूसरी गोष्ट जी  गजाला अतिशय प्रिय होती ती म्हणजे गाड़ी अर्थात बाइक. "माझ्या आयुष्यात येणा-या, समृद्ध बापांच्या विविधतेने नटलेल्या मुलीना गाडीवर फिरवण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन" अशी जणू काही
प्रतिज्ञाच  केली होती गजानं . गजा गाड़ी शिकला आणि गावातल्या लोकानी आपापले लेकर रस्त्यावर खेळू देण बंद केल. गजाच घर हे त्याच्या सुदैवान आणि गावक-यांच्या दुर्दैवान गावाच्या बाहेर असल्यान गजाची गाड़ी दिवसातून ५-२५ वेळा गावातून फिरायची. गब्बरसिंगच्या घोड्याच्या आवाज ऐकून जसे रामपुरवासी घाबरायचे तस गजाच्या गाडीचा आवाज दुरून जरी आला तरी लोक आपापले लेकर घरात घेउन जायचे. गजाची गाडीची ही हौस पराकोटीलाच नाही तर "पराअब्जाला"जाउन पोचली होती.
   एकदा आमच्या गावात रात्रीच्या वेळी एक म्हातारी वारली. आता सकाळी तर माती करायची आणि ह्या वेळेला ही बातमी बाहेरगावच्या सोय-या धाय-याना कशी कळवावी म्हणून मंडळी चिंता करत बसली होती. तेवढ्यात रामायणतल्या मारूतीने समुद्र ओलांडून जाण्याची तयारी दाखवल्याच्या आवेशात गजा गाडीवर एक रात्रीत पन्चक्रोशितिल सगळ्या गावात जावून ती ब्रेकिंग न्यूज़ देण्याची तयारी दाखवायचा. पण "गजाची धाव ही गावच्या फाटया पर्यंतच" असल्यान सर्वानी गजाचा तो प्रस्ताव बहुमतानं  फेटाळुन लावला. म्हणून मग गजा एवढा चेहरा पाडून बसला की नविन आलेले पाहुने गजाच्याच बाजूला येउन बसू लागले.
     तर असा हा गजा जेंव्हा प्रेमात पडला, अर्थात प्रेमात पडला म्हणन त्याच्या बाबतीत योग्य ठरणार नाही. कारण प्रेमात "पडतात" ते तुमच्या आमच्यासारखे सामान्यजन. गजा कधी प्रेमात पडला नाही किंवा समोरच्या व्यक्तीला कधी त्यान पडू दिल नाही. त्याच आस झाल की गजाच ग्रामसेवक होण्याच स्वप्न जेंव्हा भंग पावल तेंव्हा गजाची गाड़ी ११ वि एक १२ वि वर आली.
त्याला १२ विला ८० % मिळाले यात गजाला फ़क्त लिहिता-वाचता येत एवढाच त्याचा हात होता . बाकि सगळी त्या परीक्षा केंद्राची कृपा होती जिथून त्यान परीक्षा दिली होती. नवसाला हमखास पावना-या दैवतेप्रमाने त्या कॉपी सेण्टर म्हणून (सु?)प्रस्सिध असलेल्या  कॉलेजचा लौकिक होता. तिथून परीक्षा दिलेल्या आणि देना-या विद्यार्थ्यांच ते all time favourite अस श्रद्धास्थान होत. तर मग ह्या ८० % वर गजाला D.ed  ला सहज admission भेटल. आणि मग आपली तीसरी हौस पूर्ण करायला त्याला खरया अर्थान scope मिळाला. 



   "डी.एड लाच हाय.बाप डॉक्टरय. फुल लाइन देती आपल्याला." गजा मला सांगत होता.
" मंग? पुढी?"
 "मंग काय मंग. आता तीला फ़क्त सांगायचच  राहिलय."

 काही दिवसानी मी त्याला विचारल, " मंग. काय मनत्यात Madam ?"
    " आर काय सांगू तुला? तीनच मला propose केल नं !! "
 मग फोनफोनी सुरु झाली. तीला माझ्यासमोर फोन वर बोलताना गजा माझ्याकड आसा काही पहायचा की काही वेळान तो मला "आज मेरे पास गाड़ी है.मोबाइल है. लड़की भी है. तुम्हारे पास क्या है?" असा प्रश्न विचारतो का काय अशी भीती वाटायची.
   

   "आज तीला रूमवर घेउन गेलतो"
 "काय सांगायलास" माझ्या डोळ्यातले आश्चर्याचे भाव पाहून गजाला चेव चढला.
 " तुझी शप्पत" आस म्हणून स्वताच्याच  गळयाला त्यान हात लावला.  
  "ती एकटीच आलती?"
 "आर मंग. मी सांगीतलच होत एकटी ये मनुन"
 "मंग र? पुढी काय झालं?" माझा हा प्रश्न किती मुर्खपनाचा आहे आसं पाहत गजा म्हणाला,
 "पुढी काय आस्तया?.............."


      खुप दिवसानी आज राजा .  गावाकड आला होता.राजापन आमच्याच ग्रुप मधला. पण बाहेरगावी असतो. मी राजा आणि गजा   शेताकड़ जाणार्‍या त्या पाउलवाटेवरून गजाची स्टोरी ऐकत चाललो होतो.
  "तुज काय बाबा. सोपयं. पोरगीबी कास्ट मधलीच. बाप हुंडाबी भरपूर देतय." मी गजाला मधेच छेडल.
 "अं ! लग्न करीत असतेत का यड्या?"
 " मंग?"
"आर काय गम्मतय का काय हाय. आं?"
गजाच आणि त्या मुलीच एकमेकांवर खर प्रेम असून देखिल ते इतक्या सहज भेटलेत आणि त्यांच लग्न जमन देखिल किती सोप आहे. खरच. किती नशीबवान आहे गजा. अशी काहीशी आमची समजूत होती. पण गजा मात्र आम्हाला एकावर एक धक्का फ्री  देत होता.
"म्हणजे तुझ तिच्यावर प्रेम नाही का?" इतका वेळ शांत असलेला राजा पहिल्यांदाच बोलला.
"आर कशाच आलय प्रेम. तसल प्रेम न बिम कै करीत नस्तोय आपण"
"आर त्या पोरीचं काय? तिचा कै विचार?"
"अं ! तीच बी कैच नाही र. त्या दिवशी रूमवरच्या भेटीनंतर तीन माझा फोनच उच्चल्ला नाही २-४ दिवस. मंग एका दिवशी दुसरया नंबर वरून फोन लावला तर मनली,
"आता काय बोलायचय. तुमाला जे पाहिजे ते भेटल. मला जे पाहिजे ते भेटल."
  एक मुलगी अशी बोलू शकते ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नव्हता.
 "आता तिन आमचा मास्तरच धरलाय."
काही दिवसानी गजाचा फोन आला. गजा, त्याचा एक मित्र आणि त्यांच्या वर्गातल्या दोन मुली असा ग्रुप स्कॉर्पियो गाड़ी घेउन गेले होते चक्क एका बिअर बार वर. आणि मुलगा मुलगी असा भेदभाव न करता त्या मुली फुल आउट होईपर्यंत पित होत्या म्हणे. आता पुण्या-मुंबईच्या मानान ही गोष्ट जरी खूप छोटी असली तरी आमच्या मराठवाड्यात दोन भावी शिक्षिका एकमेकीना आग्रह करत दारू पित बसल्या होत्या ही गोष्ट नुसती ऐकन्यासाठी देखिल मन घट्ट कराव लागत.
दुसरया दिवशी सकाळी गजाचा  त्यांना  माझ्यासमोर फ़ोन 
"मंग madam उतरली का नाइ रात्रीची?"
"नाही ओ सर. पण तुम्ही मात्र पुरेपुर फायदा उठवला की?"
डि एड चे विद्यार्थी हे भावी शिक्षक असल्यान आतापासूनच त्यानी एकमेकाना सर आणि  मैडम म्हनाव ह्या एका नियमाच मात्र  ते १०० % पालन करीत होते. गजाची कारकीर्द दिवसेंदिवस वाढत होती. आता गजा एकाच वेळी ३-३ मुली हँडल तर करत होताच पण त्याला कंटाळा आलेल्या मुलींचे नंबर तो आपल्या मित्राना द्यायचा आणि त्यांचीपण सोय करायचा.
  
   राजा आज बरयाच दिवसानी गावाकडं  आला होता.आम्ही तिघे पुन्हा त्याच वाटेवरून शेताला निघालोत. गजाला मधेच  कुठल्यातरी मुलीचा फोन आला आणि मग आम्हाला, "तुमि व्हा पुढी. मी आलोच." आस म्हणून एका झाडाखाली त्यान तळ ठोकला. आम्ही पुढ निघालोत. राजानं आयुष्यात फ़क्त एकाच मुलीवर जिवापाड प्रेम केल होत. कळायला लागल तेंव्हापासून. पण शेवटी प्रेम मग ते खर असो व खोट ते नशिबातच असाव लागत. का  झाल कस झाल ते माहित नाही पण त्या  मुलीच लग्न ह्याच्या डोळ्यादेखत लागल. असेच अनेक किस्से आहेत.
     हे अस  का होत? माझ्या दुसरया एका मित्रान ज्य़ा मुलीवर प्रेम केल त्या मुलीची आणि त्याची १० वर्षात एकदाही भेट होऊ नये?
आणि इथ ह्यांच्या रोज भेटी. घंटाघंटा फोन वर बोलन. आयुष्यभर एकाच मुलीवर प्रेम करून आणि तीच लग्न झाल्यावर तिच्याच आठवणी मनात  घेउन फिरणारा माझा मित्र खरा का एका वर्षात ३ पोरी बदलणारा गजा खरा?
 हे सगळ मी राजाला बोललो तेंव्हा तो सुरुवातीला seriously घेतच नव्हता पण शेवटी मी विषय खुपच ताणून धरल्यावर तो बोलता झाला.
    " तू म्हणतोयस की हे अस का व्हाव? प्रत्येक प्रेम भंग झालेल्या माणसाला कधीतरी हा प्रश्न पडतोच. पण हा प्रश्न अजुन तरी अनुत्तरितच आहे. कहिजन म्हणत असतील की, प्रेम खर असल्यास काहीही झाल तरी मिळतच. तुमच्यातच guts नसतील. तुम्ही प्रयत्नच केले नसतील. पण मग लैला-मजनू पासून ते देवदास पर्यंत प्रेमाच प्रतिक मानल्या जाना-या यापैकी कुणालाच त्यांच प्रेम का नाही  मिळाल? आणि म्हणून ते प्रेम खर नव्हत,  किंवा त्यांच एकमेकांवर प्रेमच नव्हत  ते  अस म्हणता येइल का? 
 एवढ कशाला कृष्णाचच उदाहरण घे. कृष्णाच्या आणि राधेच्या प्रेमाच्या कथा आपण लहानपनापासून ऐकतो.पण त्यांच लग्न झालेल कधी ऐकलय? मग काय त्यांचपण  प्रेम अयशस्वी म्हनायच का? प्रेम हे मिळाल तर ठीकच पण जरी नाही मिळाल तरी त्याच्या आठवणी शेवटपर्यंत  आणि त्यानंतरदेखिल मागे उरतात.  तस नसत तर कृष्णाला इतक्या बायका असून देखिल आजही त्याच नाव राधेबरोबरच जोडल गेल नसत. ह्यातच राधेच्या प्रेमाचा खरा विजय आहे. आयुष्यात एकदाही कृष्णाची भेट न होता देखिल त्याच्या प्रेमात पडणारी मीरा काय  वेडी होती?
     प्रेमाची भावना जितकी पवित्र असते तितकीच
प्रेमात मिळालेल्या  दुखाची. आणि तितक्याच पवित्र असतात त्या
आठवणी. आणि पवित्र गोष्टी जतन करन खुप अवघड असत.त्या जतन करायला अवघड जातात आणि म्हनुनच मग मन दुखी होत.
 प्रेम हे कधीच आणि कोणीच विसरु शकत नाही. प्रत्येकजन एकांतात त्या आठवनींना  उजाळा देत असतो. त्या क्षणी त्याच्याही मनाची तीच अवस्था झालेली असते जशी कृष्णाला राधेची आठवण झाल्यावर त्याची झाली असेल, जशी सीता हरवल्यावर रामाची झाली असेल किंवा मीराबाईची  कृष्णाला  भजनं गाताना झाली असेल. त्या व्यक्तीचं मन
त्या महान परंपरेचा एक भाग  झालेलं असतं.आणि म्हनुनच त्याच्या नकळत ते  दुखात देखिल सुखावून जातं.
      "राहिला गजाचा विषय. तर त्याच देखिल खर आहे.प्रेम होण्यासाठी भावनांची पोच तिथवर असावी लागते.त्याची नाही म्हनुनच तो सुखी आहे.  आपला जन्म गेला एकाच पोरीच्या माग  फिरण्यात. आणि तो एकाच वेळी ३-३ मुलीना फिरवतोय. आणि पाठीमाग ना कुठल्या emotional attachments , ना कुठल्या आठवणी. त्याला समजतं तेवढ्या गोष्टीतून तो आनंद घेतोय आणि आपल्याला समजतात त्या गोष्टीतून आपण दुःख घेतोय.
      शेवटी अज्ञानात समाधान असत ते अस."
                     गजा बराच पाठीमाग राहिला होता.त्याचा कॉल  अजुन सुरूच होता................