जबाबदार नागरिक बनण्यासाठी... वर्गात नागरिकशास्त्राचा तास चालू आहे. मुले शिकण्यात रंगून गेली आहेत. शिक्षक उत्साहाने शिकवत आहेत.. असं दृश्य काल्पनिक वाटतं ना? बरोबरच आहे. अभ्यासक्रमांतील काही विषय शिकणे मुलांसाठी अगदीच कंटाळवाणे असते आणि म्हणूनच असे विषय वर्गात शिकवताना शिक्षक म्हणून खरी कसोटी लागते. असाच कसोटी पाहणारा एक विषय म्हणजे नागरिकशास्त्र. यातले सारे धडे मुलांना उपदेशपर वाटतात. त्यातील शासनव्यवस्थाविषयक धडे नीरस वाटतात (म्हणजे ते तसे असतातही!). एक तर यात लोकशाही, राष्ट्र, स्वातंत्र्य, हक्क इ. अमूर्त संकल्पना भरपूर असतात. त्या समजावून सांगताना भाषणबाजी केली की, मग वर्गात जांभयांचे भरघोस पीक येणारच. लोकशाही हा विषय शिकवताना निवडणुका का अपरिहार्य आहेत, त्या कशा पद्धतीने होतात अशी चर्चा सुरू झाल्यावर मी पाचवी ते सातवीच्या वर्गप्रतिनिधींच्या निवडणुका जाहीर केल्या. तशा निवडणुका बहुतेक शाळांमध्ये होतातच, पण मी हा विषय नुसता प्रतीकात्मक निवडणुकांपुरता ठेवायचा नाही, असे ठरवून त्याला अभ्यासाचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. उमेदवार ठरवणे, सूचक- अनुमोदक, बोधचिन्ह, मतदान, मतमोजणी, अंतिम निकाल या सर्व पाय-यांवर चर्चा झाली. त्यानुसार मुलांनी अर्ज भरले. स्वत:ची चिन्हे ठरवली. कल्पकतेने प्रचार केला. हक्क आणि कर्तव्य यावरील चर्चेच्या वेळी आम्हाला शाळेत कोणते हक्क आहेत व आमची कर्तव्ये काय आहेत, याची मुलांनी एक यादीच केली. त्यातून त्यांना जबाबदारीची जाणीव झाली. शिवाय वर्गप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्यांनी कर्तव्य बजावले नाही तर काय करावे, याचाही विचार करण्यात आला. निवडणुका मजेत पार पडल्या. याच वेळी महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या. त्या दिवाळीच्या सुटीत असल्याने या वर्षी पाचवी ते सातवीच्या मुलांना दिवाळीच्या सुटीत विधानसभा निवडणुका हाच विषय अभ्यासासाठी दिला. त्यासाठी त्यांना त्यांच्या इयत्तेनुसार प्रश्नही काढून दिले. ‘पालकांची मदत लागली तर घेऊ शकता, पण स्वत: वृत्तपत्र, टी.व्ही., रेडिओ यांचा वापर करून जाणून घ्या’, असे सांगितले. बरीच मुले सुट्टीत गावी जातात. त्यांना तिथेही हा अभ्यास करता येणे शक्य होते. प्रश्नावलीत ‘ही कितवी विधानसभा निवडणूक आहे, तुझ्या मतदारसंघात कोण उभे होते, त्यांची निशाणी काय होती, त्यांनी प्रचार कसा केला, प्रत्यक्ष निवडणूक कधी झाली, कोण निवडून आले, कोणाला सर्वाधिक जागा मिळाल्या, सत्ताधारी पक्ष म्हणजे कोण, विरोधी पक्ष म्हणजे काय, मुख्यमंत्री कोण झाले, मंत्रिमंडळ केव्हा स्थापन झाले, कुणाला काय खाती मिळाली’ यासारखे प्रश्न होते. मुलं सुट्टीभर सर्व साधनांचा वापर करून उत्साहाने माहिती मिळवत होती. यामध्ये मुद्दामच पालकांचा सहभाग असावा, असे सांगितले होते. सुट्टीनंतर मुलं शाळेत आली तेव्हा समजले की, सुरुवातीला पालकांचा प्रतिसाद नकारात्मक होता. ‘तुला काय कळणार आहे राजकारणातलं? राजकारण म्हणजे घाणेरडा विषय, त्यावर कशाला बोलायचं?’ अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या होत्या, पण मुलांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि पालक मुलांशी बोलायला लागले. मुलांनी प्रसारमाध्यमांचाही मुलांनी चांगला उपयोग केला. सर्व माहिती स्वत:च जमवल्याने त्यांना हा विषय वर्गात न शिकवताही उत्तम समजला. ‘सुट्टीत कशाला हो ताई अभ्यास’, असे म्हणणा-या मुलांनी सर्वात आधी आपला प्रकल्प सादर केला! त्यात त्रुटी एकच होती, ती म्हणजे मंत्रिमंडळ जाहीरच झालेले नसल्याने मुलांचा एक प्रश्न अपुरा होता. अर्थात त्यात त्यांचा काही दोष नव्हता. मराठीतून शपथ घेणे, त्या वेळी झालेली मारामारी यावरही वर्गात हिरीरीने चर्चा झाली. हा रूक्ष विषय पाहता-पाहता बोलका झाला. मुलांनी केवळ निवडणुकीचीच माहितीच मिळविली नाही तर आई-वडिलांना मतदान करण्यास प्रवृत्त केले. सातवीच्या मुलांनी विचारपूर्वक उत्तरे लिहिली, शिवाय स्वत:ची मतेही मांडली. उमेदवार गुन्हेगार प्रवृत्तीचा नसावा, पैसे देऊन मत विकत घेऊ नये, लाऊडस्पीकरचा वापर कमी करावा, अशी मते मुलांची या विषयाबाबतची सजगता दर्शवणारी होती. या प्रकल्पातून आम्हाला काय मिळाले, याचा विचार केला तर ‘ही मुले लहान आहेत, यांना काय कळते’ हा आमचा आणि पालकांचा भ्रम दूर झाला. मुलं टी.व्ही.वर बातम्या पाहू लागली. वर्तमानपत्रे वाचू लागली. दैनंदिन घडामोडींची माहिती आपल्याला असायला हवी, हे त्यांना पटले. सहावीतल्या उमाने तर तिच्या घराजवळील मैदानात खेळताना होणा-या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविषयी त्या भागातील नगरसेवकाकडे तक्रार करून त्यांचा बंदोबस्त केला! हा प्रश्न घरापर्यंतही जाऊ न देता मुला-मुलींनी स्वत: सोडवला. यापेक्षा नागरिकशास्त्र हा विषय मुलांना चांगला समजला याची कसोटी कुठली असू शकेल? पालक ब-याचदा मुलांशी राजकारणाबद्दल चर्चा करत नाहीत. तसं न करता मुलांना राजकारणाबद्दल समजेल अशा भाषेत माहिती द्यायला हवी. निवडणुकीच्या प्रचारसभांना त्यांना घेऊन जायला हवं. याबाबत पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. वृत्तपत्र वाचन, टी.व्ही.वर बातम्या बघणं या गोष्टींमध्ये मुलांना आवर्जून सहभागी करून घ्यायला हवं. दैनंदिन घडामोडींची माहिती मुलांना द्यायला हवी. त्यांनी पुढाकार घेऊन एखादी गोष्ट केली तर त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. त्याच्यातील नेतृत्वगुणांना वाव द्यायला हवा. त्यातूनच सुजाण नागरिकांची निर्मिती होऊ शकेल, केवळ घोकंपट्टी करून नव्हे! |
lekh लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
lekh लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, २४ ऑगस्ट, २०११
बुधवार, १० ऑगस्ट, २०११
आदरणीय पु.लं....सप्रेम नमस्कार...!
आदरणीय पु.लं....सप्रेम नमस्कार...!
'एक झुंज वाऱ्याशी' द्यावी त्याप्रमाणे आपण मृत्यूशी कणखर झुंज देऊन, 'मराठी वाड्मयाचा गाळीव' इतिहास मागे ठेवून, तमाम रसिकांना पोरकं करून निघून गेल्याला आज एक तप झालं. आपल्या जाण्याने 'ती फुलराणी' देखील कोमेजली..! आपण गेलात तरी वाचकांशी असलेलं आपलं 'मैत्र' आपल्या साहित्याच्यारुपाने आमच्या हृदयात चिरंतन राहील..! 'नारायण, सखाराम गटणे, नामू पारिट, अंतू बारावा' यासारख्या अनेक 'व्यक्ती आणि वल्ली' देखील आपल्या जाण्याने हळहळल्या असतील. शेवटी, आयुष्य म्हणजे तरी काय? 'तीन पैशाचा तमाशा..!' आपल्या निघून जाण्याने आम्हा सर्वांची नियतीने घोर 'फसवणूक' केली असली, तरी आपल्या अभिजात वाड्मयाने यापुढच्या पिढ्यांचीही 'हसवणूक' होतंच राहील.
आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की, आमच्या पिढीने पु.लं. पाहिले..! वाचले...!! ऐकले...!!! 'खोगीरभरती' झालेल्या मराठी साहित्य विश्वातील 'मोठे मासे छोटे मासे' स्वतःला 'अंमलदार' समजतात. त्यांनी कितीही 'वटवट-वटवट' केली, तरी आपल्या लेखनाची 'अपूर्वाई' इतरांच्या साहित्यात आम्हाला कधी वाटली नाही.
आपण काही 'अघळ-पघळ' जरी लिहिलं, तरी ती कधी 'नसती उठाठेव' झाली नाही. आपल्या प्रत्येक कलाकृतीला रसिकांची मनापासून 'दाद' मिळत गेली. आपल्या प्रत्येक लेखनाने साहित्यातले एक 'नवे गोकुळ' निर्माण केले. आपल्या शाब्दिक कोट्याची 'पुरचुंडी' सुदाम्याच्या पोह्याप्रमाणे आम्हाला कायम मेजवानी वाटली.
विनोदाच्या वस्तऱ्याने आपण अनेकांची 'खिल्ली' उडवली; पण कुणाला जखमी करण्याचा हेतू त्यात कधीच नव्हता. वेळप्रसंगी आपण निर्ढावलेल्या राजकारण्यांना 'राजा औदिपौस' च्या थाटात 'चार शब्द' देखील सुनावले, पण राज्याकार्त्यांनिसुद्धा आपल्यावरच्या 'आपुलकी' मुळे आपल्याशी असलेलं 'गणगोत' प्राणपणाने जपलं...! 'गुण गाईन आवडी' म्हणत आपण अनेक प्रतिभावंतांची आम्हाला ओळख करून दिलीत.
आपल्या अमोघ वक्तृत्वाने आम्हाला आपण 'रसिका हो...! मित्र हो...!! श्रोते हो....!!!.' अशी प्रेमपूर्वक 'दाद' दिली. तेव्हा आपल्या अजरामर साहित्याने आमचं उरलं-सुरलं आयुष्य 'पुलकित' होऊन गेलं..! आपल्या आठवणीचे 'पूर्वरंग' पाहून त्यांची 'गोळाबेरीज' केली तर आमच्या मनात सदैव साठून राहील 'पु.ल. एक साठवण...!'
आपला,
गंगाधर टिपरे...!


मुला-सुनाशी मैत्री जरी वाढवली, तरीही वृद्धाश्रम,पाळणाघरांची संख्या नाही घटली!
फेसबुकवर किंव्हा वर्तमानपत्रे व इतर माध्यमातून सद्य कौटुंबिक समस्यान बद्दल खूप चर्चा सातत्याने वाचायला मिळते . पाळणाघर आणि वृद्धाश्रमांची गरज ही वाढत आहे. त्यासाठी वृद्धाश्रम आणि पाळणाघरांची संख्या कमी पडत आहे. त्यासाठी सर्व पिढ्यांनी विचार करण्याची गरज आहे.
पालक आपल्या मुलांचे वयाच्या २६-२७ पर्यंत संगोपन करताना दिसते. काही मूले १०-१२ वि नंतर पायावर उभे राहून शिक्षण घेतात. आता मुलांचे शिक्षण, नंतर नोकरी किंव्हा व्यवसाय ,नंतर विवाह. आताच पालकांच्या पुढे मुलांनी ठरवून विवाह,प्रेम विवाह ते लीविंग relationship पर्यंत बदल पाहावे लागले. मूले येथे देशात किंव्हा परदेशात राहिली तरी ती अनेक कारणांमुळे विभक्त राहणे पसंत करतात. नातवानचे संगोपन आपल्या आई-वडिलांनी करावे,तर तेही या मुलांच्या मर्जीने असते. ते जेथे राहतील तेथे पालकांनी जायचे स्वतःला अपग्रेड करायचे आणि ते करूनही त्यांना चांगले शब्द किंव्हा मान दिला जात नाही. आताच्या अनेक घरान मध्ये माहेरच्या माणसांची अधिक दखल फूट पाडताना दिसत आहे. मुलाना पालक की पत्नी तर ते पत्नी सोबत म्हणून तिचा विचार अधिक करणे पसंत करतात . चूक-बरोबर कोण हे पहिले जात नाही. आयुर्मान वाढले आहे,पालकांना त्यांच्या आई-वडील,सासू-सासरे यानाही बऱ्याच ठिकाणी पाहावे लागत आहे.या सर्व परिस्थितीत पालक मानसिक खच्ची होत आहेत .जरी केली सुनेशी मैत्री, तरी मुलं-सुनवास होणार नाही याची नाही खात्री!
गीतेतील तत्वज्ञान जेव्हा खरे अनुभवायला लागते ,तेव्हा कळते की सांगणे सोपे व अंगीकारणे अवघड असते. आपल्या पोटच्या मुलांनी आपल्याशी आपुलकीने बोलावे,चौकशी करावी या मानसिक आधाराची अपेक्षा तर राहतेच ना ! मुला-मुलीनी कितीही वाजता रात्री घरी येणे,त्यांचे अधिक स्वतंत्र पणे वागणे हे मुला-मुलीना गैर वाटत नाही. घराचे मंदिर असावे अशा अपेक्षा करणाऱ्यांची कुचम्बना होते. काळी वाटते ,त्यावरून वैचारिक मतभेद होतात. पालक व्यसनी असणे मुलांच्या हितकारक नसते,त्यातही आताच्या पिढीचा स्वार्थीपणा असतो,की त्यामूळे त्यांच्या मुलाना ते कसे सांभाळतील. म्हणजे आईने तुळशीला पाणी घालावे व यांनी दारू ढोसावी ही अपेक्षा असते. वीकएंड संकल्पना आली आहे,त्यात हेच दिसून येते,की तेव्हा यांच्या मुलाना सांभाळले,तर पालक चांगले,नाहीतर ते वाईट. फक्त स्वार्थाने संबंध सुधारू शकत नाहीत. त्यासाठी मुलं-सुनांनी ही हे आपले घर आहे ही भावना बाळगायला हवी. माझे -तुझे हे फार सुरू झाले आहे. तुमचे तेही माझे आणि माझे ते माझे हा विचार बरोबर नाही! आई-वडील,घरातील देव कोणी सांभाळायचे हा प्रश्न सगळीकडे उपस्थित होतो आहे. तेथे पालकांनीही देव संकल्पना बदलायला हवी. देव कोणावर लादू नयेत.
अनेक पालकानच्या समस्या मी पहिल्या देश -परदेशात! समस्या खूप चिंताजनक आहेत. स्त्री अर्थार्जन करायला लागली,तिचेही विचार बदलले. शिक्षण,पैसा आला. त्यामुळे उन्मत्तपणा, अहंकार वाढीस लागले. मुलीना स्वयंपाकघरात जाणे पसंतच नाही,बरे जे करतात त्यांना करतात म्हणावे तर तेथेही केले सासूने म्हणून काय बिघडले असा व्यवहार! ज्या बाईने सासुरवास भोगला तिला पुन्हा तिच्या चांगुलपणाच्या व्यवहाराने ,सुनेशी मैत्रीच्या नात्याने वागूनही सुनवास भोगावा लाग्नारयानची संख्या वाढली,आणि पालक वेगळे राहणे,अलिप्त होणे पसंत करू लागले. व्यक्ती तितक्या प्रकृती,त्यामुळे काही ठिकाणी सासुरवास सुनांना भोगावा लागतो आहे. वेगळे राहिले की ही समस्या सुटते आहे. स्त्री आर्थिक स्वतंत्र झाल्याने सासुरवास प्रकारचे प्रमाण कमी झाले.
मान द्यावा आणि घ्यावा हे खरे आहे. मुलाना प्रेम दिले तसेच त्यांना चुका करताना पालक काही गोष्टी सांगतात. दोन्ही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. आताच्या पिढीत अरेतुरेत किंव्हा आई-बाबांचे नावच मूले घेतात. आता हे परिवर्तन घडत आहे. त्यांच्या पिढीच्या समस्या अजून वेगळ्या असतील.त्यानाही उमजेल.
मुलाना त्यांच्या पद्धतीने जिवन जगू द्यावे,मूले पाश्चात्य संस्कृतीचा त्यांना हवा तेवढाच अंगीकार करतात,असें दिसून येत आहे.कर्तव्यांची जाण त्यांना द्यावी लागत आहे. पालकान मध्ये एकटा पालक असणार्यंची सख्याही बरीच आहे. त्यांच्यावर मूले असताना जवळ नाहीत म्हणून एकटे राहणे,किंव्हा त्यांच्याशी जमवून घेणे हे पर्याय राहतात. अनेक ठिकाणी मुलं होई पर्यंत मूले एकत्र राहतात,आणि जरा मोठी झाली,की वेगळे होतात. या मध्ये भावनांची गुंतवणूक झालेली असते. त्यातून बाहेर पडणे कठीण होते. भविष्य बघून आणि देव-देव करून मानसिक शांतता मिळत नाही,ती स्वत:चे चिंतन करूनच आणावी लागते. पक्षान प्रमाणे निरपेक्ष पणे जिवन जगणे शिकावे लागते.
मुलांनी १६ व्या वर्षी आपल्या पायावर उभे राहून स्वतचे शिक्षण पुरे करावे. कोणीही कोणाकडून फार अपेक्षा बाळगू नयेत. पालकांच्याही आर्थिक विवंचना कमी होतील.स्वतः साठी पैसे शिल्लक ठेवू शकतील. या मूळे मुलेही सुखी आणि पालकही सुखी! मूले मोठी झाली,आप -आपल्या मार्गाला लागली हे दुरून पाहण्याची पालकांना सवय होईल व मुलानाही सवय होईल. भावनांच्या गुंतवणुकीने सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या भावनांना आवर घालणे व दूर राहून संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करणे हा मार्ग उचित वाटतो. आताच्या काळात पूर्वीचे नियम लागू होवू शकत नाही हे लक्षात आले आहे.
आपल्या संस्कृतीचे सण-उत्सवांचे अर्थ हे कुटुंब-समाज एकत्र कसा राहील,स्नेहभाव कसा वाढीला लागेल या अर्थानी आहेत.पण ते समजून घेण्याची सर्वांची क्षमता हवी! आपली मानवधर्म सांगणारी संस्कृती आहे . निसर्गाशी जो मैत्री करेल,त्यास जिवन उमजेल. जाणा आपुला स्वधर्म, रुजवा मनी मानवधर्म!
मंगला
Mangala Bhoir bhoirmangala@gmail.com
आयुष्य फार सुंदर आहे! ...

॥ हरि ॐ ॥
एकदा लग्न झालं की , आपलं आयुष् य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असं वाटण्याची जागा,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वा ढतच जाते .
दरम्यानच्या काळात, आपली मुलं अ द्याप मोठी झालेली नाहीत . ती ज रा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू ला गतो .
मुलांच्या वाढत्या वयात, त्यां च्या भवितव्याच्या सुंदर स्वप् नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की स ारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.
आपला नवरा / बायको जरा नीट वागा यला लागला लागली की...
आपल्या दाराशी एक गाडी आली की . ..
आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली क ी ...
निवृत्त झालो की ...
आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जा ईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो.
खरं असं , की आनंदात असण्यासाठी , सुखात असण्यासाठी आत्ताच्या
वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ को णतीही नाही .
आयुष्यात आव्हानं तर असणार आहे तच. ती स्विकारायची आणि ती झे लता झेलताच आनंदी राहायचा निश् चय करायचा हेच बरं नाही का?
जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये , अस ंच बराच काळ वाटत राहतं .
पण, मध्ये बरेच अडथळे असतात. का ही आश्वासनं पाळायची असतात, को णाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं....
आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथ ळे म्हणजेच जीवन होतं.
या दृष्टिकोनातून पाहिलं की कळत ं ,
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.
आनंद हाच एक महामार्ग आहे.
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा .
शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन् हा जाण्यासाठी ... वजन चार किलो ने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी ... कामाला सुरुवात होण्यासाठी ... एकदाचं लग्न हो ऊन जाऊदे म्हणून ... शुक्रवार स ंध्याकाळसाठी ... रविवार सकाळसा ठी... नव्याकोऱ्या गाडीची वाट ब घण्यासाठी... पावसासाठी... थंडी साठी... सुखद उन्हासाठी ... महि न्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो. एकदा चा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आ पली समजूत घातलेली असते.
पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनं दी होण्याचं ठरवा .
विराज नाईक
virajvnaik@yahoo.comदेवाजीचे पुस्तकं वाचा, गवसेल माणुसकीचा साचा!

सामाजिक कामात वाहून घेतलेले असें माझे माहेर, त्यांनी जाती -पाती मानत नाही हे आपल्या घरातून उदाहरण दाखविण्या साठी माझे लग्न मागास जातीत करून दिले . मी ७ वर्षांची असताना पितृछत्र हरवले,१८ वे वर्ष सुरू झाले,आणि लग्न होवून पुण्यातून कोकणातील गावी रोपटे रुजले. या रोपट्याला इतक्या विषम वातावरणात जगणे फार कठीण होते.माहेरची ब्राम्हण,शहरात शिकलेली,आणि इकडे घरातील मोठी सून व १० माणसांची जबाबदारी शिरावर आली. शिक्षित कुटुंब असले तरी मागील पिढी अशिक्षित होती. घर या वस्तीच्या भागातच होते. शिवराळ भाषा,राहणीमान पाहून हबकून गेले होते. आईने सांगितले की चुलीतले लाकूड चुलीत जाळले पाहिजे. रडून काही साध्य होणार नव्हते. प्रथम विरोध पत्करून येवून-जावून १ मूल होते तरी बी एस सी पूर्ण केले.
माझ्या मावस सासूबाई गेल्या तेव्हा वस्तीतीतील लोक आले व म्हणाले दारू मिळाली तर रात्रभर रडायला बसू, तेव्हा मी त्यांना सांगितले की दारू मिळणार नाही,तर सावकाराने त्यांना फतवा काढला की कोणीही जायचे नाही,आणि मित्र-परिवाराचे सहाय्याने क्रिया-कर्म उरकले. या घटनेवरून चिडून न जाता मी तेथे सामाजिक काम करण्याचे ठरविले. प्रथम घराच्या ओटीवर सारवून,घरो-घरी फिरून मुलांना संस्कार वर्गाला पाठवा म्हणून समजावले,परंतु,पुन्हा त्यांना सावकाराची भीती. घरातून मला विरोध, भटाला दिली ओसरी,आणि भट हात पाय पसरी हे टोमणे. मी शेजार-पाजार ची ४-५ मुलांना आणि माझ्या मुलांना घेवून वर्ग चालू केला. स्वच्छता, गाणी,गोष्टी ,खेळ,श्लोक,पाढे असें सुरू केले. बाकीची मूले लांबूनच पाहत,हळू-हळू एक-एक मूल येवू लागले,कोणी कडेवर लहान बाळाला घेवून बसायचे. शेंबडी-लोम्बडी पोरे घेवून बसते,म्हणून घरात शिव्या.
मोठा मासा लहान माशाला खात असतो. तो त्याचे आर्थिक,शोषण करतोच आणि त्यातील माणसाचा गुलाम करून ठेवतो. नीतिमत्तेचा पायाच ढासलवतो ही सावकारी लोकांचा पैसा,जमीन जुमला,त्यांच्या स्त्रिया-मुलां पासून सार्यांचेच शोषण करतो हे मी पहिले. माझ्या कुटुंबात कोणावरही अन्याय झालेला मला सहन होत नसे. अगदी सासूवर सासर्यांनी हात उगारला,तर तो हात धरण्याचे काम मी करे. सर्वांच्या दृष्टीने मी आगावू ठरले होते. त्यामुळे कौटुंबिक मानसिक त्रास अधिक सहन करावा लागत होता. घरातही शेतातील आलेल्या गड्यांना वेगळे अन्न,फुटके कप दिले की मी समजवायचे की हे चालणार नाही. आणि सर्वाना समान वागणूक द्याला हवी म्हणू झगडायचे. ब्राम्हणांनी तुम्हाला जातीभेदाने वागवले म्हणता,आणि तुम्ही इतरांना तसेच वागवता,मग दुसऱ्यांना दोष का देता हे मी सांगायचे . आपल्या घरात आधी लक्श घालायलाच हवे. खूप समतोल राखावा लागतो. कधी चुका नसतना माफी मागावी लागते,पण करायचे ,त्यातच अहंकार मरून जातो. मुलांना वस्तीतील मुलांमध्ये सामील करायचे नाही,असें घरातून दर्डावायचे. ओटी सारवून,मुलांचा वर्ग नीट चालू झाला,पण सावकारीन त्यावर पाणीच टाक,खरकटे टाक ,तुमच्या आवाजाचा त्रास होतो,भांडणे करू लागली.
वस्तीतील बहुतांश स्त्री-पुरुष दारू सेवन करीत,व रोज घरा घरातून भांडणे. प्रथम शेजारी असलेली फुग्याची (गावठी) दारू विकणाऱ्याला पोलीसान करवून धमकी दिली,त्याला मी सरबताची गाडी नाक्यावर लावून दिली,आणि हा गुत्ता बंद केला. आता लोकांचा विश्वास माझ्या वरील वाढत होता. मला सारे काकू म्हणत. आमच्याच घरातील बाजूच्या एका खोलीत मी लोकांची बैठक घेवू लागले. वस्तीतील चव्हाट्याच्या जागेची कागदपत्रे मी कचेरीतून आणली ,ती जागा सावकाराची नसून त्यावरील देऊळ व जागा सर्व समाजाचे आहे हे सर्वाना बैठक घेवून समजावून सांगितले. चव्हाट्या च्या जागेतच संस्कारवर्ग भरू लागला . त्याचा परिणाम असा झाला,की जो तो आपला परिसर स्वच्छ ठेवू लागला ,पाणी शिपडून चव्हाट्याची जागा स्वच्छ झाली . देवळाची किल्ली ,सावकाराकडे ,ती आणण्या साठी गावातील ज्येष्ठ लोकांना सांगितले. देऊळ वस्तीसाठी खुले झाले,आमच्या बैठकी तेथे होवू लागल्या .
स्त्रिया बैठकीला कमी प्रमाणात येत ,त्यासाठी आपल्या धार्मिक कार्यक्रमांचा आधार घेवून कार्यक्रम सुरू केले. स्त्रियांचे वेगळे मंडळ तयार केले. बचत खाते सुरू केले.स्त्रियाही सर्व कार्यक्रमात ,अगदी खेळातही भाग घेवू लागल्या .समाजाचे एक रजिस्टर मंडळ स्थापन करून त्यावर त्यांच्यातील ज्येष्ठ व तरुण मिळून कार्यकारिणी केली . घरटी महिना 20 रुपये वर्गणी ठेवली . संक्रांत हळदीकुंकू ,गणपती - नवरात्री उत्सव ,भोंडला,कृष्ण जन्म ,15 ऑगस्ट -26 जानेवारी , विविध खेळांच्या स्पर्धा , आरोग्य शिबिरे ,निरनिराळ्या विषयांवर समाज -प्रबोधनपर व्याख्याने इत्यादी कार्यक्रम आखले गेले. दारू- जुगारीचे प्रमाण कमी होवू लागले. मुला-मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले सर्वाना आदर युक्त भीती होती,त्यामुळे तरी लोक ऐकत असत .गोळा होणाऱ्या वर्गणीतून सर्व कार्यक्रम पार पडायचे ठरले. आर्थिक दुर्बल कुटुंबातील मृत व्यक्तीनच्या जाळीत साठीही पैसे नसत ,त्यामुळे त्यांची प्रेते पुरली जात ,त्यांना जाळीत साठी रक्कम तरतूद केली गेली . कोणाच्या घरी मयत झाले तर दारू न पिता कोरा चहा प्यावा ,तेराव्या दिवशी दारू- मटना ऐवजी ,सोडा व उकडलेली अंडी असें सुरू केले. आता वाचणाऱ्याला वाटेल हे काय ,परंतु समाजात एकदम प्रथांना विरोध करून तुम्ही त्यांचा सर्वांगीण विकास साधू शकत नाही.
कामाचा व्याप एकटीने सांभाळणे कठीण होते,कारण रोज एक-एकांचे भांडण मितव ,कोणावर रॉकेल ओतले तर तिला वाचवायला जा , सावकाराशी भांडणे, कोणाचे लग्न लावून दे,कुणाचे बाळंतपण कर अशा अनेक तऱ्हा . पोलीस आणि वकील याकडे लोकांनी जावू नये त्यामुळे मला ते निस्तरावे लागे . माझ्या इतर मैत्रीणीना घरोघरी जावून सामाजिक कार्यासाठी प्रवृत्त केले. त्यातील मला कार्यकर्त्यांचा संच मिळाला . वस्तीतही कार्यकर्ते तयार झाले होते. आरोग्य शिबिरे नेहमी भरवणे गरजेचे होते,कारण येथे घरा-घरातून क्षयरोगाच्या केसेस होत्या . खरुज- नायटा कातडींचे रोग इत्यादी . डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडून औषधे व त्यांचे साहाय्य मागितले . सर्वांच्या सहयोगाने कार्य सफल होवू लागले.
हमालांची वस्ती जवळच होती,त्यांच्यातील महिअलन ज्ञानेश्वरी वाचण्याची इच्छा होती,माझ्या मागे लागल्या बाई तुम्ही शिकवा आम्हाला . तेथे प्रौढ साक्षरता वर्ग चालवला ,आणि तो सफल झाला. जेव्हा निरक्षर सरस्वती ज्ञानेश्वरी वाचू लागली,तेव्हा माझा आनंद गगनात मावेना . हे सर्व कार्य वाढीस लागले गावात असें ६ संस्कार केंद्रे महिला कार्यकर्त्यांनी चालवली. मी स्वतः सायकलवर फिरत असें,नंतर जुनी लूना घेतली,जुने कपडे गोळा करून आणून गरजूंना देत असें. मला आधुनिक बोहारीण म्हणत . शाळा-शाळेतून फिरून शिक्षानाधीकार्यांशी चर्चा केली. अनेक मुळे सरकारी शाळात चौथी पर्यंत गेली तरी बाराखडीही येत नव्हती. वस्तीतील मुलासाठी अभ्यास वर्ग ठेवले. तरुणांना त्यांना शिकवण्यास प्रवृत्त केले. एक-मेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे प्रत्ययास आले !
महिला सुरक्षा समितीचेही काम केले. काम करताना अनेकांच्या धमक्यांना तोंड द्यावे लागे . महिलांसाठी पापड उद्योग अंगणात चालू केला. मुलांसाठी मला अर्थार्जन करणे गरजेचे होते,शिवाय मला स्वतचे पैसे असले म्हणजे लोकांना अडी-नदीला मदत करता यावी,म्हणून मी माझा कारखाना आणि दुध डेरी व्यवसाय चालू केले. यातून वस्तीतील काही जणांना रोजगार उपलब्ध झाला. घरातही मदतनीस म्हणून ठेवल्या. घर-संसार ही तारेवरची कसरत होती. मुलांचे अभ्यास,आजारपणे,दीर-नंदांची लग्ने, बाळंतपणे, ६-७ लहान मुलांचे पाहणे ,३ सासू-व सासरे यांचे ताल सांभाळणे, हे सारे करण्यात वारंवार आजारी पडू लागले. मला २६ व्या वर्षीच rhumatik arthritis झाला . माझ्या इच्छा शक्तीने सर्वावर मात करीत सारा गाडा पुढे खेचणे चालू ठेवले. नंतर आदिवासी भागात ३ वर्ष काम केले,त्या साठी मला या वस्तीतीलच कार्यकर्ते मिळाले. कुटुंबीय,समाजातील दानी लोक,बँका, सर्वांच्या सहकार्याने सामाजिक कार्य करता आले. माझ्या कुम्बियाना माझ्या या कार्याचा निश्चितपणे त्रास सहन करावा लागला.
मला प्रकृतीमुळे २००१ सालानंतर थांबावे लागले, सासू-सासऱ्यानची सेवा घडली हे माझे भाग्य,त्यांच्या आशीर्वादाची पुंजी मिळाली,त्यांची लाडकी झाले होते. माझ्या पाठीशी संकट काळी तेच धावून आले. आज ते नाहीत,परंतु त्यांचे आशिर्वाद मला सुखी जिवन देत आहेत. मुलांच्या भविष्यासाठी व माझ्या प्रकृती साठी पुण्यात स्थाईक झाले. येथे माहेरच्या लोकांची ही मदत लाभली माझ्या मैत्रिणीनी जे कार्य आम्हाला अपेक्षित होते ते खूपच वाढवले आहे. मला त्यांचा सार्यांचा अभिमान वाटतो. माझ्या जिवनातील २० वर्ष तरी मी कार्य करू शकले,त्यामुळे मला हे देवाजीचे पुस्तकं वाचता आले,आणि माणसात देव गवसला. माझ्यातील माणुसकीचा साचा गवसला! ज्याला मी नरक समजत होते,तेथेच मला स्वर्ग गवसला.
मी कोणत्याही कार्यात पदस्थ झाले नाही, कोणालाही कधी जामीन राहिले नाही ही पथ्ये कामात पाळली. माझ्या कर्म भूमी तील या जन सागरातील मी एक बिंदू होते. मी तेथे नसण्याने फरक पडणार नव्हता, एक खांबी तंबू नसावाच! कार्यकर्त्यानची दुसरी फळी उभी राहिली त्यामुळे मी आज शांतपणे जिवन जगत आहे. आज वस्तीतील,गावातील ,आदिवासी पाड्यातील जी मूले-मुली चांगली शिक्षित ,उच्च शिक्षित झाली,मोठी झाली,निर्व्यसनी निघाली, ज्यांची लागा लावून दिली ती सुखाने नांदताना पाहून आंतरिक समाधान मिळते आहे.
मंगला
|
बायकांनी घराबाहेर व पुरुषांनी घरात बसून घरकाम करावे, यात कसली आली आहे स्त्री-पुरुष समानता?
काही वर्षांपूर्वी कुठल्याश्या एका साप्ताहिकात एक पत्र आलं होतं. त्या साप्ताहिकाचं व पत्र-लेखकाचं नाव आज मला आठवत नाहीये. त्या पत्रात, पत्र-लेखकाने एक प्रश्न विचारला होता तो मात्र ठळकपणे आठवतोय. तो प्रश्न असा होता की, जर एखादा सुस्थापित मुलगा एखाद्या नोकरी-व्यवसाय नसलेल्या मुलीशी लग्न करू शकतो, तर एका सुस्थापित मुलीने एखाद्या सुशिक्षित, पण नोकरी नसलेल्या मुलाशी लग्न करायला काय हरकत आहे?
काय, गडबडलात ना? काही क्षण मी सुद्धा सर्द झालो. बरोबर आहे! कारण प्रवाहाच्या विरुध्द जाण्याचा आपण कधी विचारच करत नाही. परंपरेची बंधनं सहजासहजी झुगारून देणं आपल्या संस्कृतीत बसत नाही. थोडा विचार केल्यावर त्या प्रश्नातला फोलपणा मला जाणवला. वास्तविक, एखादा सुशिक्षित मुलगा नोकरी-व्यवसाय न करता तसाच बसून राहील हे माझ्यातरी आकलनापलीकडचं आहे. अर्थार्जनासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग तो नक्कीच करेल. तेव्हा सध्याच्या युगात हा बदल अशक्य आहे.
का?
त्यासाठी थोडं भूतकाळात जाऊ या....
पूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. चूल आणि मुल या परिघाबाहेर ती कधी गेलीच नाही. त्यामुळे पुरुष अर्थार्जनासाठी घराबाहेर पडत असे. स्त्रिया घरातली जबाबदारी पार पाडत असे. घरातला कर्ता-करविता पुरूषच असायचा. त्यामुळे घरातले जवळजवळ सर्व निर्णय परस्पर तोच घ्यायचा. त्यात बायकोचा हस्तक्षेप नसायचा. बायकोनी काही सुचवलं तर "तुला काय त्यातलं कळतंय" असं म्हणून तिला डावललं जायचं आणि त्यातूनच पुरुष-प्रधान संस्कृती जन्माला आली. पुरुष स्त्रियांपेक्षा शरीराने सशक्त असल्यामुळे त्याने कमवायचं व आपल्या बायको मुलांचं पालनपोषण करायचं असा एक समज रूढ झाला. त्यामुळे पुरुष 'पुरुषी अहंकार' जपू लागले. आणि मग ती आपली परंपराच झाली. या परंपरेचा पगडा इतका जबरदस्त होता, की आजही काही पुरुष, पुरुष-प्रधान संस्कृती जपताना दिसतात. मी पुरुष-प्रधान संस्कृतीचं समर्थन करतोय अशातला भाग नाही; पण वास्तव नजरेआड करून देखील चालत नाही. आणि म्हणूनच असेल कदाचित, की नोकरी करणारी स्त्री आजही उठून चहापाणी, घरातील इतर कामं , सासूला स्वयपाकात मदत इत्यादी कामं करते. तसे संस्कार तिच्यावर तिच्या आई-वडिलांकडून झालेले असतात!
पण आज परिस्थिती बदलली आहे. आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण घेतात. शिक्षण क्षेत्रात स्त्रिया आज पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. उद्योग, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या बरोबरीने यशस्वीपणे वावरताना दिसते. आज घरातल्या महत्वाच्या निर्णयात स्त्रियांचा विचार, त्यांची मतं ग्राह्य मानली जातायत. स्त्रीच्या जीवनात आता एवढी क्रांती झाली आहे की, स्त्री ही फक्त व्यक्ती न राहता शक्ती झाली आहे व ती केवळ संसाराची शिल्पकार न राहता राष्ट्राची शिल्पकार झाली आहे.
सध्या महागाईने इतका कळस गाठलाय की, नवरयाच्या एकट्याच्या पगारात संसाराचा गाडा चालविणे महाकर्मकठीण होऊन बसलंय. म्हणूनच आज नवरा-बायको दोघेही अर्थार्जनासाठी घराबाहेर असतात. काही काही कुटुंबाला तर दोघांचा पगार देखील अपूरा पडू लागलाय. म्हणून काही पुरुष पार्ट-टाईम किवा एखादा जोडधंदा करताना दिसतात. तेव्हा, आज नवरा-बायको दोघांनी नोकरी करणं अपरिहार्य झालय. घरात रिकामं बसणं परवडणारं नाहीये.
पत्र-लेखकाने विचारलेला प्रश्न खुद्द स्त्री-वर्गाला मान्य असेल असं वाटत नाही. कारण प्रत्येक आई-वडिलांना आपली मुलगी सासरी सुखात नांदावी असे वाटत असते. मुलगी सुद्धा आपल्या भावी जोडीदाराची, सुखी-संपन्न संसाराची स्वप्नं रंगवत असते. आपला नवरा राजबिंडा नसला, तरी कर्तबगार व स्वाभिमानी असावा, असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. लग्न करण्यापूर्वी आई-वडील प्रामुख्याने मुलाच्या नोकरीची चौकशी करतात. हेतू हा, की तो त्याच्या बायको-मुलांचे व्यवस्थित पालनपोषण करू शकेल का? मग इतर माहिती गोळा करतात. आज शिक्षणामुळे मुली देखील विचारी बनल्या आहेत. आपल्या शिक्षणाच्या बरोबरीने तोलामोलाचा नवरा निवडण्याचं स्वातंत्र्य आज मुलीना शिक्षणामुळे मिळालंय. आई-वडिलांनी निवडलेल्या मुलाच्या गळ्यात निमुटपणे माळ घालण्याचे दिवस आता इतिहासजमा झालेत. तोलामोलाचा नवरा न मिळाल्याने लग्नाचं वय निघून गेलेल्या अविवाहित मुली आजही पाहायला मिळतात. त्यामुळे कोणतेही आई-वडिल आपल्या मुलीला जाणून-बुजून नोकरी-व्यवसाय नसलेल्या मुलाच्या गळ्यात बांधणार नाहीत. नोकरी-व्यवसाय नसलेल्या मुलाशी लग्न केलेली सुस्थापित मुलगी अजून मला भेटायचिए.
मी आमच्या ऑफिसमधल्या काही मुला-मु लींची या बाबतीतली मतं आजमावली. काही मुलींचं म्हणणं होतं, की हा बदल निव्वळ अशक्य. एकीने तर 'आपल्या परंपरेचं ओझं सहजासहजी खाली ठेवण शक्य नाही' असं सांगितलं. काही मुलीनी 'सध्या शक्य नाही, पण भविष्यात अशक्यदेखील नाही' असं सांगितलं. माझा रोख सद्य परिस्थितीवर आहे. भविष्यात काय दडलय हे कोणीच सांगू शकत नाही. भविष्यात काहीही शक्य आहे. भविष्याबद्दल इतक्या ठामपणे सांगायला माझंतरी धाडस होत नाही. एका मुलीला "तू नोकरी-व्यवसाय नसलेल्या मुलाशी आज लग्न केलं असतं का?" असं विचारलं असता "आज नसतं केलं" असं ती प्रांजळपाने म्हणाली. काही मुलांनी तर, हा बदल पुरुष जातीला आळशी, कुचकामी बनवणारा आहे असं सांगितलं. एक जण म्हणाला की, "जर मुलगी सुस्थापित असेल आणि तिला जर नोकरी-व्यवसाय नसलेल्या सुशिक्षित मुलाची दया आली व तो तिला आवडला, तर ती त्याच्या बरोबर लग्न करेल देखील. फार तर ती त्याला सांगेल की, तू घर सांभाळ, मी नोकरी सांभाळते." इथे पुन्हा जर-तर च्या गोष्टी! मी त्याला म्हणालो की, जर तिला २०-२५ हजार रुपये पगार असेल, तर मग ती घरकाम करायला एखादा नोकरच ठेवेल की! आणित्यातूनही तिने जर लग्न केले , तर मला वाटतं की ती त्याला आळशी, निरुद्योगी बनवतेय. यावर मा झा मित्र लगेच म्हणाला, "मग सुविद्य; पण नोकरी-व् यवसाय नसलेली बायको आळशी, निरुद्योगी समजायची काय?" मी त्याला म्हणालो, "जर ती सुविद्य, सुशिक्षित असेल आणि नोकरी न करताच बायको म्हणून ती मिरवत असेल, तर नक्कीच ती तिचं टयालेंट फुकट घालवतेय." बरं, नोकरी-व्यवसाय नसलेल्या, घर सांभाळणाऱ्या नवरयाला वाईट नाद लागण्याचादेखील संभव आहे. त्यापेक्षा तिने त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवावं. त्यासाठी त्याला अर्थ सहाय्य करावं. त्याच्यातला स्वाभिमान जागा करावा. असं जर तिने केलं, तर तिच्या सुशिक्षितपणाला अर्थ आहे असं मी समजेन. सर्वच मुली नोकरी-व्यवसाय नसलेल्या मुलांशी लग्न करू लागल्या, तर मग स्त्रीमुक्तीवाल्यानी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? कदाचित मग स्त्री-प्रधान संस्कृती जन्माला येईल आणि पुरुष मुक्तीसाठी पुरुषांना एखादी संघटना काढावी लागेल. हे चक्र मग असेच चालू राहील. मग माझा एक चिकित्सक मित्र मला म्हणाला, "पूर्वी बायका बॉबकट, स्लीवलेस ब्लाउज किवा मिनी स्कर्ट घालत नसायच्या. पण आज सर्रासपणे हे सर्व चालतंय ना? (खरं तर आज पूर्ण कपडे घालणं निषिद्द मानलं जातंय) तेव्हा आज आपण हा बदल स्वीकारलाय ना? मग पत्र- लेखकाने सुचवलेला बदल का स्वीकारला जाऊ नये?" मला वाटतं की, बॉबकट, स्लीवलेस ब्लाउज किवा तोकडे कपडे हा फशनचा भाग झाला. हे पाश्चात्त्य देशाचं अनुकरण झालं. उलट, आपल्या बायकोने कसं दिसावं हे आजकाल पुरूषच ठरवतात असं मी ऐकून आहे. तेव्हां हा बदल स्वीकारार्ह आहे. कारण त्यामुळे पुरुषी इगो दुखावला जात नाही. पण बायको कमावणार व नवरा घरकाम करणार यात कुठेतरी पुरुषी इगो दुखावला जातो. पत्र-लेखकाने सुचवलेला बदल जर अमलात आणायचा असेल, तर पुरुषांना आपली मानसिक जडण-घडण बदलावी लागेल.
खरंतर, पत्र-लेखकाने उपरोक्त बदल सुचवून एकाला उद्योगी तर दुसर्याला निरुद्योगी बनवण्याचा घाट घातला आहे असं मला वाटतं. ते एकाला महत्व देत आहेत , तर दुसरयाला दुय्यम ठरवताहेत. बायकांनी घरा बाहेर व पुरुषांनी घरात बसून घरकाम करावे, यात कसली आली आहे स्त्री-पुरुष समानता?
पण पत्र-लेखकाला हे स्त्री-पुरुष समानतेच्या वाटेवरील पुढचं पाऊल वाटतंय असं त्यांनीच आपल्या पत्रात पुढे म्हटल्याचं आठवतंय. मला वाटते की, उलट चार पावलं आपण मागे जात आहोत. इथे पत्र-लेखक पूर्व-परंपरा कायम ठेवतायत. फक्त प्यादी बदलताहेत.
आपल्याकडे मुला-मुलींना वाढवताना जो भेद केला जातो, तोच मुळात चुकीचा आहे. मुलींची कामं वेगळी आणि मुलांची कामं वेगळी हे लहानपणीच मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. बायकांची कामं, पुरुषांची कामं हा भेदच नष्ट केला पाहिजे. मुला-मुलींना वाढवताना स्त्री-पुरुष म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून वाढवलं पाहिजे. समानतेच बीज लहानपणीच मुलांच्या मनात रुजवलं पाहिजे, तरच उद्याचा सुबुद्ध समाज आपण निर्माण करू शकतो.
स्त्री लहान व पुरुष महान असे समजणे ही विकृती आहे. तसेच दोघेही समान असे समजणे ही संस्कृती आहे. मला वाटतं की None of them is supplementary but both of them are complementary to each other.
मी तर असं म्हणेन की, दोघांनी आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा संसारासाठी , देशाच्या उज्वल भविष्यासाठी उपयोग करावा व जीवनातला आनंद मनमुराद लुटावा. संसारात दोघांनी एकमेकांना मदत करावी. वाट्याला आलेली सुख-दुख्खे हसत खेळत झेलून जीवनाच्या उपवनात खरया अर्थाने समानतेची फुले फुलावावीत.
त्याचा सुगंध घ्यावा लागणार नाही, तो आपसूक सर्वत्र दरवळेल.
गंगाधर टिपरे ....!
मी तर असं म्हणेन की, दोघांनी आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा संसारासाठी
त्याचा सुगंध घ्यावा लागणार नाही, तो आपसूक सर्वत्र दरवळेल.
गंगाधर टिपरे ....!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
