बुधवार, १० ऑगस्ट, २०११

सण समारंभ साजरे करून ,मराठी बाणा ,जपूया


                                                                          
 करण्या संवर्धन संस्कृतीचे ,मराठी बाणा हा राखावा .
                                                                             


सण समारंभ साजरे करून ,जपूया हा" अमोल ठेवा " वर म्हन्त्ल्याप्रमाणे मराठी सण व संस्कृतीचे एंकमेकांशी अगदी जुळ्याचे नाते आहे असे म्हंटले तरी चालेल.चैत्र महिन्याच्या १ ल्या दिवशीच्या "गुढीपाडव्यापासून"ते फाल्गुनातील होळी पौरनिमेपर्यंतप्रत्येक सण हा आपल्या जीवनाशी निगडीत आहे, आपले सण पूर्वजांनी अशा पद्धतीने  आखले आहेत कि प्रत्येक सणाशी आपले आरोग्य कसे चांगले राहील ,आपल्या जगण्याशी निगडीत गाय ,बैल ,साप यासारख्या प्रण्यांविशायीची कृतज्ञता कशी जपली जाईल किंवा पुर्वाजान्विशायीची कृतज्ञता पुढच्या पिढीने कशी व्यक्त करावी याचाही विचार झाला आहे.आपले सहा ऋतू तसेच उन्हाळा, पावसाळा ,हिवाळा या कळत आहार कसा असावा ?व त्याचा मेळ सणाशी घालून तो कसा जनमान्य करता येईल हे पहिले,गेले.घरातील लहान मुल ते वृद्ध प्रत्येकाला कसे सामावून घेता येईल हे हि पहिले गेले.           
वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा कादुनिम्बाची पाने व गूळ खाउन व गुढी उभारून साजरा करताना संपूर्ण घराचे आरोग्य व आनंद जपला गेला तर आषाढात पोटाचे आरोग्य जपण्यासाठी .आषाढी इकादशी असते, वास्तविक आपण करतो ती इकादशी दुप्पातखाशी असते.पूर्ण दिवस लंघन करणे हा खरा उपास व तो आरोग्यकारक हि आह"गुरु पौर्णिमेला "आपल्या गुरुजनान्विशायीची कृतज्ञता व्यक्त करतो."नागपंचमीला नागाची पूजा करतात कारण  शेतकऱ्याला शेताची नासधूस होऊ नये यासाठी त्याचे महत्व मानले गेले,""नारळी पौर्णिमेला बहिण भावाला राखी बांधून आपले रक्षण करण्यास सांगते .तर कोळी बांधवांचे जीवनच ज्या सागरावर आवलंबून आहे त्यालाही नारळ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी विश्रांती असते गणपती आणि दिवाळी हे तर मुख्य सण!त्यात नवरात्रही आलेच !या मोठ्या ३स नामधून मराठी संस्कृतीचे वैभव  दिसून येते. छोट्याश्या उंदराचे वाहन करून जेवा गणपती घरी येतो तेव्हा बालगोपालांच्या आनंदाला पारावार राहत नाही त्या प्रसंन्तेला विसर्जन  करून परत आल्यावर किती उदास होतो आपण?"नवरात्र" हे स्त्रीशक्तीला पुजण्याचे प्रतीकच!तर होळी पौणिमा हे सर्व आमंगाल्तेला नसतं करण्याचे!शिवाय हरतालिका वटपौर्णिमा यासारखे सण हे निसर्गाच्या सानिद्ध्या त  घरातल्या सुवासिनीने जावे यासाठीच खास आहेत.             पण या सणांना सद्ध्या ज्या पद्धतीने साजरे केले जाते ते चुकीचे आहे असे वाटते.            
 आपले सण आपण पूर्वापार पद्धतीने का?व कसे? साजरे करावेत हे आपण समजून घ्यायला हवे नाही का?              
आपल्याला मिळालेला हा संस्कृतीचा संरूपी"अमोल ठेवा" आपणच जतन करायला हवा नाही?         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा