बुधवार, १० ऑगस्ट, २०११

आयुष्य फार सुंदर आहे! ...



विराज वि नाईक

 हरि  


एकदा लग्न झालं की , आपलं आयुष् सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं... 
असं वाटण्याची जागा
मूल झालं की... 
मोठं घर झालं की... 
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . 
दरम्यानच्या काळातआपली मुलं द्याप मोठी झालेली नाहीत . ती रा मोठी झाली की सारं ठीक होईल अशी आपण मनाची समजूत घालू लागतो . 

मुलांच्या वाढत्या वयातत्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की ारं कसं आनंदानं भरून जाईलअसं आपल्याला वाटत असतं
आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की... 
आपल्या दाराशी एक गाडी आली की ... 
आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली  ... 
निवृत्त झालो की ... 
आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईलअसं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो
खरं असं , की आनंदात असण्यासाठीसुखात असण्यासाठी आत्ताच्या 
वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही . 
आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतचती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का
जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये , असंच बराच काळ वाटत राहतं . 
पणमध्ये बरेच अडथळे असतातकाही आश्वासनं पाळायची असतातकोणाला वेळ द्यायचा असतोकाही ऋण फेडायचं असतं.... 
आणि अगदी शेवटी कळतंकी ते अडथळे म्हणजेच जीवन होतं
या दृष्टिकोनातून पाहिलं की कळत , 
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही
आनंद हाच एक महामार्ग आहे
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा . 
शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी ... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी ... कामाला सुरुवात होण्यासाठी ... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून ... शुक्रवार ंध्याकाळसाठी ... रविवार सकाळसाठी... नव्याकोऱ्या गाडीची वाट घण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी ... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतोएकदाचा तो टप्पा पार पडला कीसारं काही मनासारखं होईलअशी आपणच पली समजूत घातलेली असते.
पणअसं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा .
विराज नाईक
 virajvnaik@yahoo.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा