बुधवार, १० ऑगस्ट, २०११

वटपोर्णिमा

  


          आपल्या हिंदू संस्कृतीत व्रताना खूप महत्व आहे.पूर्वींच्या तुलनेत सध्याची स्त्री हि अधिक सुशिक्षित झाल्यामुले वेल आणि पैसा यांना महत्व येऊन व्रतांचे महात्म्य कमी झाले.आज
'लीव इन रिलेशनशिप "चा जमाना आहे. त्यामुळे वटपौर्णिमा कालबाह्य ठरते आहे.दुर्दैवाने या व्रतांमागील नेमका हेतू विधी आणि फळ याची माहिती नसल्याने व्रत म्हणजे उपवास व पूजा अशीच संकल्पना धृढ होते आहे.उपवास म्हणजे भरपूर फराळाचे पदार्थ खाणे व पूजा म्हणजे अवडंबर माजवून दिखावा करणे,यामुळे आधुनिक पिढीला त्यातील महत्व कळत नाहीये.असो. कुठल्याही व्रताची ५ अंगे आहेत. संकल्प,पूजा, उपवास, दान व विशिष्ट आचार,हि होत.कोणत्याही व्रताची सुरवात संकल्पानेच करावी.व्रताच्या दिवशी फलाहार करावा .पण फलाहाराचे भ्रष्ट  रूप फराळ होऊन रोजच्या जेवणासारखे पदार्थ खाल्ले जातात. हे सर्व पदार्थ पित्त वाढवणारे  व पचनाला जड असल्याने त्याचा त्रासाच होतो.हि व्रते करताना आपल्या  पूर्वजांनी वयाचाही विचार केला आहे .सर्वसाधारण ५०  वर्षापर्यंतच व्रते आचरावी. एकदशि सारखे व्रत मात्र शेवटपर्यंत केले जाते.खर म्हणजे पती-पत्नीचे एकमेकवर खरे प्रेम असेल तरच वटपौर्णिमा साजरी करण्यात अर्थ आहे.दोघातील स्नेहबंध धृढ करणारा असा हा सण आहे.
            सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळविण्यासाठी यामराजना आपल्या भक्तीने संतुष्ट करून आपल्या पतीचे प्राण परत्र मिळविले. अशी आख्यायिका पुराणात आहे,
                                                                             करुनी निश्चय मनासी,नारद बोले सावित्रीसी;
                                                                              ज्येष्ठमास त्रयोदशी ,  करुनी पूजन  वदासी ;
                                                                               त्रिरात्र व्रत करुनी,     मागे औष्य चुड्यासी;
                                                                                येईल यम छालावाया ,शरण जी तयापासी.............
            वटसावित्री व्रताची सुरवात पौर्णिमेच्या आधी दोन दिवस होते. सौभाग्य मीळो   ; वटवृक्षाप्रमाणे  कुल वाढो;अशी भावना या व्रतामागे असते.  प्रत्येक दिवशी १०८ प्रमाणे ३ दिवस वडाला प्रदक्षिणा घालतात. ३ दिवस उपवास करतात.पण कालमानानुसार यात बदल झाला आहे.हे व्रत १ च दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा या दिवशी केले जाते.
            पुजेची तयारी करताना हिरव्या बांगड्या,कापुर, पुजेची कापसाची गेजवस्त्रे,  गळेसर ,विड्याची पाने,सुपारी ,पैसे,पंचामृत व गुलखोब्रर्याचा नैवेद्या ५ आंबे ,दुर्वा वगै. इत्यादी साहित्याची तयारी ठेवावी.
प्रत्यक्ष पूजेला सुरवात करताना प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. हळद -कुंकू ,गंध ,लाल फुल अक्षता यांनी गणपतीची पूजा झाल्यावर वादाची किंवा वादाचे चित्र असणाऱ्या कागदाची पूजा करावी.
या दिवशी उपवास करावा.  वाडापुढे आंबे व पैसे ठेवावे.५ सवाष्णीची आंबा व गव्हाने  ओटी भरावी. काही ठिकाणी १ वाण घरात ठेऊन  बाकीची  इतर ४  घरी जाऊन देतात. वडाला ३ प्रदक्षिणा घालाव्या. वडाला गुंडाळायचा दोरा तिहेरी आसतो.विवाहानंतर सुवासिनी असेपर्यंत प्रत्येक स्त्रीने हे व्रत करावे.हे सौभाग्यावार्धक व्रत आहे.
            आधुनिक काळात अगदी जन्मोजन्मी हाच पती मिळावा हे मागणे सयुक्तिक नसले तरी निदान आहे या जन्मात आपल्या सह्चाराच्या विचारांशी मुलांसमोर सहमती दाखवून नंतर सावकाश त्याचे दोष त्याला
समजावता येतात. तसेच वेळ नाही म्हणून वादाची फांदी आणून पूजा करणे हे मुळीच योग्य नाही. ज्या वृक्षाची आपण पूजा करतो त्याच्याच फांद्या तोडून त्यांची पूजा करणे हे हास्यास्पद आहे. त्यासाठी घरी पाटावर
वडाचे चित्र गंधाने काढून त्याची पूजा करावी.या व्रतास "ब्रह्मसावित्रीची पूजा " असेही म्हणतात.
            आपण ठरवले तर फक्त "वटपौर्णिमा" च नाही तर इतर सण उत्सव, व व्रते यांना मुळ स्वरूपाला बाधा  न आणू देता नवे स्वरूप देऊन जपता येतील. भक्तीने केलेली साधी पूजा हि मला पोहोचते.असे भगवंतच  सांगतात. असो .नवीन दृष्टीकोन स्वीकारून हि वटपौर्णिमा आपण साजरी करूया.




madhvi dani danimadhvi@gmail.com  

1 टिप्पणी:

  1.      दरवर्षी सात जूनला आपण 'जागतिक पर्यावरण दिन'साजरा करतो .याच महिन्यात मराठी महिन्याप्रमाणे ज्येष्ठ पोर्णिमेला 'वटपौर्णिमा' हा सण साजरा केला जातो .सुवासिनी स्त्रिया हा सण साजरा करतात .

             जन्मोजन्मी सात जन्म हाच पती मिळावा ,आपल्या पतीला निरोगी दीर्घायुष्य लाभावे ,म्हणून श्रद्धाभावे या व्रताचे आचरण केले जाते .सावित्रीने सतत नामस्मरण करून वटपौर्णिमेआधी चार दिवस उपवास केला होता .प्रत्यक्ष यमराज तिच्या पतीस नेण्यास आले असता युक्ती प्रयुक्तीने पतीचे जीवन प्राप्त करून घेतले .ही घटना वटवृक्षाखाली घडल्यामुळे स्त्रिया वटपौर्णिमेदिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात .प्रतीकात्मक सुतगुंडीचा दोरा घेऊन वडाभोवती सात फेऱ्या मारतात .वडाच्या पानावर आंबा ,फणसगरा,करवंद केळे किंवा उपलब्ध ५ फळे ,दोऱ्यात ओवलेले काळे मणी  इतर स्त्रियांना हळद कुंकू लावून देतात .

                   आपण या सणामागील शास्त्रीय महत्त्व जाणून घेऊ 

    वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे .एक  यज्ञिय वृक्ष आहे .

                  याच्या पानांचा उपयोग पत्रावळीसाठी, मुळे ,पाने,चिक ,साल, वडाच्या पारंब्या यांचा औषधात यशस्वी वापर केला जातो .झाड प्रचंड मोठे असल्याने पक्ष्यांचे आश्रयस्थान ,झाडांची सावली पांथस्थांना उपयोगी पडते .अशा प्रकारे वडाचे झाड बहुगुणी व आरोग्यदायिनी आहे .

                 विचार केल्यासआजच्या स्त्रियांचे आयुष्य ही फार धकाधकीचे आहे .नोकरी -चुल-मूल या  त्रयींची कसरत करता करता तिला स्वतःसाठी तसा वेळ मिळत नाही .पारंपरिकताही  पाळते .या सणाच्या निमित्ताने सात फेऱ्या मारताना चालणे हा एक व्यायाम  होतो.श्रद्धेबरोबर मोकळी हवा मिळते .मनाला प्रसन्नता व आनंद मिळतो .

                 वाण वाटताना वडाच्या पानांचा वापर केला जातो .त्यासाठी वडाच्या झाडांची मोठय़ा प्रमाणावर तोड केली जाते  वास्तविक पाहता या काळात पानगळी चालू झालेली  असते.गळून पडलेल्या पानांचा त्या काळी वापर केला जात असे परंतु पैसा कमावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वडाच्या झाडाची तोड झाल्यामुळे पर्यावरण हानी होऊ लागली आहे .

          जागतिक पर्यावरण रक्षणासाठी आपल्या भारत देशाची निवड झाली आहे .त्यानिमित्ताने पर्यावरण रक्षण व पारंपरिक सण यांची सांगड घालावीशी वाटते .

              मला मनापासून असे आवाहन करावेसे वाटते की या वर्षीपासून वडाच्या पानातून न देता  सर्व स्त्रियांनी जमेल तसे एकत्र जमून  फलाहार करावा .वडाच्या फांद्यांची विक्री झाली नाही तर वृक्षतोड थांबेल .मान म्हणून फळांबरोबरच कोणतेही एक छोटे झाड एकमेकिंस  देऊन ते वाढविण्याचा प्रयत्न करावा .फक्त पतिराजांच्या नव्हे तर अवघ्या मानव जातीच्या  आरोग्यासाठी उपयोगी होईल .पर्यावरणाचे रक्षण होईल .

            काय मग आवडली   का कल्पना ?चला  तर मग पारंपरिकतेतून निसर्गाकडे !!!
                                        स्वरूपअनाजी सावंत .                                       शिक्षिकासाधना विद्यालय 

    उत्तर द्याहटवा